कार-मोटारसायकल धडकेत मयडेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2015 01:16 IST2015-12-08T01:16:07+5:302015-12-08T01:16:51+5:30
बार्देस : मयडे येथील सॉ-मिलजवळील रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कार व मोटारसायकल

कार-मोटारसायकल धडकेत मयडेत एक ठार
बार्देस : मयडे येथील सॉ-मिलजवळील रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कार व मोटारसायकल यांच्यात टक्कर झाल्याने दुचाकीवरील जयदीप आनंद नाईक (वय ४५, आताफोंडावाडा-मयडे, बार्देस) हा जागीच ठार झाला.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयडेहून म्हापशाकडे कार (क्र. जीए ०५ बी ४५२२) येत होती, तर मोटारसायकलवरून (क्र. जीए ०१ एल १९४३) जयदीप हा म्हापशाहून मयडेच्या दिशेने जात होता. मयडे सॉ-मिलजवळ दोन्ही वाहनांत टक्कर झाल्याने त्यात जयदीप गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. म्हापसा पोलीस स्थानकाचे हवालदार चंद्रकांत पार्सेकर यांनी पंचनामा केला व गंभीर जखमी अवस्थेतील जयदीप याला पेडे-म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. म्हापसा पोलिसांनी कारचालक रुफिना डिसोझा हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आल्वितो रॉड्रिग्ज करत आहेत. (प्रतिनिधी)