शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

फोंड्यात दोन अपघातात एक ठार, डोक्याला जबर मार, दोन जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 20:43 IST

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: येथे रविवारी रात्री उशिरा व सोमवारी भल्या पहाटे झालेल्या दोन अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर दोन व्यक्ती जखमी होण्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात आशिष अरुण पाटील हा तरुण मृत्यूमुखी पडला आहे. सविस्तर वृत्तानुसार आशिष पाटील आपले कामकाज आटपून ,आपली दुचाकी क्रमांक जी ए- ०५ -वी -५१८६ वरून -रात्री घरी परत जात असताना,रात्री दहा वजता  बोरी येथे बगल रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या हिताची ह्या  अवघड वाहनाला त्याची मागून धडक बसली. सदर अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच मरण पावला.

 लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर अपघात झाला आहे. मागचे काही महिने बगल रस्त्याचे काम चालू आहे.  कर्नाटकला जोडणारा हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रात्री अपरात्री वाहनांची वर्दळ चालू असते. तशातच परत ह्या रस्त्यावर विजेच्या खांबांची सोय नाही. परिणामी संपूर्ण परिसरात काळोख पसरलेला असतो. ज्यावेळी एखादे वाहन जात असते, त्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाशाचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत .रविवारी घडलेला सदर अपघात सुद्धा अशाच प्रकारातून घडण्याची शक्यता आहे. काम झाल्यानंतर कंत्राटदाराने सदरचे वाहन हे बाजूला ठेवायला हवे होते. रस्त्यावर ठेवणे बरोबर नव्हते. आशिष पाटील हा मूळ खानापूर (कर्नाटक) येथील असून  सध्या तो केजीएन नगर मध्ये राहत होता.

दुसऱ्या एका अपघातात आर्टिगा कार व पिकआप यांच्या दरम्यान झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे. सविस्तर वृत्तानुसार सरस्वती मंदिर परिसरात पहाटे चार वाजता अर्टिगा क्रमांक जीए- ०८- एम- ७१५० व पिकअप क्रमांक केए- ०६- एबी- 23 57 यांची समोरासमोर टक्कर झाली. सदर अपघातात यश पालेकर (वय 18 राहणार फोंडा) व सिद्धि नाईक ( 19 राहणार कुडचडे) हे गंभीर जखमी झाले असून गो मे को मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फोंडा पोलिसांनी दोन्ही अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात