‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा
By Admin | Updated: October 19, 2015 02:29 IST2015-10-19T02:29:04+5:302015-10-19T02:29:43+5:30
पणजी : ‘आॅक्टोबर हिट’चा जबरदस्त तडाखा गोवेकरांना जाणवू लागला आहे. रविवारी पारा ३४.७ अंश सेल्सियसवर पोहोचला. गुरुवारी १५ रोजी ३५.२ अंश सेल्सियस

‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा
पणजी : ‘आॅक्टोबर हिट’चा जबरदस्त तडाखा गोवेकरांना जाणवू लागला आहे. रविवारी पारा ३४.७ अंश सेल्सियसवर पोहोचला. गुरुवारी १५ रोजी ३५.२ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.
सूर्य आग ओकत असल्यासारखी स्थिती असून दुपारी घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. पुढील काही दिवस हे तापमान कायम राहणार आहे.
येथील हवामान वेधशाळेचे साहाय्यक शास्रज्ञ एन. हरिदासन् यांना विचारले असता ते म्हणाले की, आॅक्टोबरमध्ये तापमान काहीवेळा ३५ अंश सेल्सियसच्याही पुढे जाते. मान्सून माघारी परतताना तापमानात आणखी वाढ होते. हा त्याचाच परिणाम आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक पावसाचीही शक्यता आहे.
किनारी भागांमध्ये तापमान जास्त आहे. किनारी तापमान समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याशी निगडित आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तापमान नोंद झाल्याचेही आढळून आले आहे. जुने गोवेत एला फार्म हाउसवर असलेल्या तापमान नोंद करणाऱ्या उपकरणात शुक्रवारी ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंद
झाले.
११ आॅक्टोबर रोजी राज्यात कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सियस, १२ रोजी ३२.४ अंश सेल्सियस, १३ रोजी ३३.२ अंश सेल्सियस, १४ रोजी ३५ अंश सेल्सियस, १६ रोजी ३४ अंश सेल्सियस तर १७ रोजी ३४.८ अंश सेल्सियस नोंद झाले.
(प्रतिनिधी)