शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 22:37 IST

गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. 

पणजी - गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. 

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. १९७0 च्या दशकात ज्या शिक्षकांची भरती झाली ते आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सुमारे ८00 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. खाजगी शाळा १९८0 च्या दशकानंतरच आल्या. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २0२0 साली १५0 ते २00 सरकारी प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षक असणे हे एकादृष्टीने चांगलेच परंतु या ज्येष्ठ शिक्षकांना माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कठीण होत आहे. सुमारे ४५0 हून अधिक रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. 

सरकारी मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. पटसंख्येअभावी गेल्या पाच वर्षात ११३ प्राथमिक शाळा बंद पडल्या. एक, दोन अशी अगदीच कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या काही शाळा जवळच्या दुसºया सरकारी शाळेत विलीन करण्यात आल्या. 

चालू शैक्षणिक वर्षात (२0१७-१८) पटसंख्येअभावी ५ प्राथमिक शाळा जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलीन करण्यात आल्या. साधनसुविधा विकास महामंडळाने चार वर्षांच्या काळात ३१९ शाळांची डागडुजी केली त्यावर ५८ कोटी ३५ लाख ७५ हजार २६८ रुपये खर्च करण्यात आले. ५८५ शाळांची दुरुस्ती अद्याप व्हायची आहे. शाळांच्या डागडुजीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात आहे. शाळेच्या इमारतीची प्रत्यक्ष स्थिती, संबंधित इमारतीची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे काय, शाळेतील विद्यार्थीसंख्या या सर्व गोष्टी विचारात घेऊन शाळा इमारतींची दुरुस्ती हाती घेतली जाते, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात एकाही खाजगी व्यवस्थापनाला नवीन शाळेसाठी परवानगी दिलेली नाही. २0१३-१४ या वर्षात ३९, २0१४-१५ या वर्षात ३५, २0१५-१६ या वर्षात १९ तर २0१६-१७ या शैक्षणिक वर्षात २0 प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. विद्यार्थी कमी झाल्याने या शाळा बंद कराव्या लागल्या. पटसंख्या कमी झाल्यास नजीकच्या सरकारी शाळांमध्ये या शाळा विलीन केल्या जातात. अशा पाच शाळा चालू शैक्षणिक वर्षात विलीन करण्यात आल्या. 

टॅग्स :Teacherशिक्षकgoaगोवा