शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आता पेड सेक्ससाठीही आधारकार्ड अनिवार्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 09:48 IST

विविध सरकारी सेवांसाठी  आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँक खात्यांपासून मोबाइल नंपर पर्यंत सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता तर चक्क पेड सेक्स करण्यासाठी आधार कार्ड...

पणजी - विविध सरकारी सेवांसाठी  आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँक खात्यांपासून मोबाइल नंपर पर्यंत सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता तर चक्क पेड सेक्स करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. गोव्यात पेड सेक्सची मागणी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड मागितले जात आहे. दिल्लीतून गोव्यात फिरण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांना आलेल्या अनुभवावरून ही बाब उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पाच तरुण गोव्यात बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले होते. तेथे त्यांनी एका दलालाशी संपर्क साधून आपल्यासाठी पाच मुलींची मागणी केली. हे पाचही तरुण उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. येथे त्या दलालाने त्यांना फोन करून मुलींची सोय झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दलालाने पुन्हा फोन करून आधार कार्डची मागणी केली.  त्याने त्या तरुणांचे नाव, हॉटेल इत्यादी माहिती घेतली. मुलींची मागणी करणारे तरुण हे पोलिसांनी पाठवलेले माणूस तर नाहीत ना याची खबरदारी त्याला घ्यायची होती. त्यासाठीच त्या व्यक्तीने हॉटेलच्या रूमची चावी आणि आधारकार्ड व्हॉट्स अॅपवर पाठवण्यास सांगितले. जेणेकरून कोणत्याही पद्धतीने पोलिसांच्या हातून पकडले जाऊ नये, याची पुरेपूर काळजी त्याच्याकडून घेण्यात येत होती.  या प्रकारामुळे दिल्लीतून आलेल्या या तरुणांची अवस्था काहीशी विचित्र झाली होती. मात्र तो दलाल मुली पुरवण्याआधी तरुणांच्या संपूर्ण माहितीवर अडून बसला होता. कोणताही दगाफटका होण्यापासून वाचण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तो पुनपुन्हा सांगत होता. गोव्यात जोरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर लगाम घालण्यासाठी गोवा पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच गोव्यातील एजंट आणि दलाल यांच्याकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाgoaगोवाIndiaभारत