शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:39 IST

रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत.

पणजी - शिक्षकांना रेमेडियल वर्ग घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही पद्धतीची सूट मिळणार नाही. यामुळे आता शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत शाळेत थांबावे लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत. सरकारी, अनुदानीत आणि विना अनुदानीत शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी हे वर्ग सक्तीचे आहेत. आता या शिक्षकांनी रेमेडियल वर्गाच्या सक्तीच्या विरोधात तक्रारी केल्या तरी त्यांच्या तक्रारी घेऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित आमदारांना केले. कारण हा शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यात तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

बाणावलीचे आमदार वेन्सी वीएगश यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. केवळ रेमेडियल वर्ग घेतले म्हणून शिक्षणाचा दर्जा वाढत नाही. प्राथमिक इयत्तेपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः शिक्षक भरतीकरतानाच  त्याची खबरदारी घेतली पाहिजे. भरती केलेले शिक्षक हे सक्षम नसेल तर काही फायदा नाही, असे विएगश यांनी सांगिले. तसेच अनुदानित विद्यालयांच्या बाबतीत साधन सुविधांच्या सुसज्जतेसाठी अधिक अनुदान देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कारण शिक्षण क्षेत्राची सर्वाधिक धुरा ही अनुदानित शाळा वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा ऑफद रिकॉर्ड देणग्या घेतात -विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून विद्यालयांना देणग्या घेणे हे बेकायदेशीर आहे. तरीही काही अनुदानीत शैणिक संस्थांकडून अनाधिकृतरीत्या अशा देणग्या घेण्याचे प्रकार आढळून आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कदाचित या देणग्या त्या सस्था विद्यार्थ्यांसाठीही वापरत असतील, परंतु सक्तीच्या देणग्या घेणे बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी