वाहन कर भरा आता आॅनलाईन
By Admin | Updated: July 3, 2015 01:26 IST2015-07-03T01:26:34+5:302015-07-03T01:26:46+5:30
पणजी : वाहनांची नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) आता वाहतूक खाते स्मार्ट कार्डच्या रूपात देणार आहे. तसेच वाहनधारकांना सर्व प्रकारचे कर वाहतूक

वाहन कर भरा आता आॅनलाईन
पणजी : वाहनांची नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) आता वाहतूक खाते स्मार्ट कार्डच्या रूपात देणार आहे. तसेच वाहनधारकांना सर्व प्रकारचे कर वाहतूक खात्याकडे आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. अशा प्रकारच्या विविध योजनांचा शुक्रवारी सरकारकडून आरंभ केला जाणार आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. कोणत्या सेवा आॅनलाईन करता येतील व कोणत्या सेवांचा आरंभ शुक्रवारी करता येईल, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. विविध खात्यांना त्याबाबत सतर्क करण्यात आले.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया सप्ताहाचे गोव्यात उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री पार्सेकर हे करणार आहेत. पर्वरी येथील सचिवालयातील सेमिनार सभागृहात याबाबतचा कार्यक्रम होईल. राज्यातील अधिकाधिक सेवा आॅनलाईन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी काही योजना सुरू होतील.
वाहतूक खात्याकडे वाहनधारकांना विविध प्रकारचे कर व शुल्क भरावे लागते. रस्ता कर, प्रवासी कर वगैरेंचा यात समावेश होतो. वाहन नोंदणीवेळीही काही शुल्क व कर भरावे लागतात. हे सगळे कर यापुढे आॅनलाईन भरता येतील. ही माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांच्याकडून मिळाली. वाहनांची नोंदणी आॅनलाईन करण्याची सोय आहे. मात्र, आता वाहन नोंदणी पुस्तिका स्मार्ट कार्डच्या रूपात दिली जाणार
आहे. आज शुक्रवारी या सेवेचा आरंभ होईल,
असे देसाई यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)