शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

जमिनींचे झोन बदलण्यासाठी शुल्क; अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 9:36 PM

गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत होता विषय

पणजी : राज्यातील विद्यमान प्रादेशिक आराखडय़ानुसार ऑर्चड जमिनींचे झोन सेटलमेन्ट झोन व औद्योगिक आणि शैक्षणिक झोनमध्ये रुपांतरित करण्यासाठी अखेर शुल्क निश्चित झाले आहे. नगर नियोजन खात्याच्या कलम 16 ब नुसार शुल्क निश्चित करून त्याविषयीची अधिसूचनाही जारी झाली आहे.यापूर्वी विधानसभेत सरकारने याविषयी घोषणा केली होती. पण गेले तीन महिने हा विषय विविध स्तरांवर फिरत राहिला. मध्यंतरी अॅडव्हॉकेट जनरल यांच्याकडेही त्याविषयीची फाईल गेली होती. झोन बदलाचा प्रस्ताव हा मध्यंतरी वादग्रस्त ठरला होता. तथापि, नगर नियोजन खात्याने शुल्क निश्चिती केली असून, पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंत जर कुणाच्या जागेचा झोन ऑर्चडपासून सेटलमेन्ट करायचा असेल, तर त्यासाठी प्रति चौरस मीटरप्रमाणे कोणतेच शुल्क जमा करावे लागणार नाही. फक्त एकदाच प्रक्रिया शुल्क म्हणून पाच हजार रुपये भरावे लागतील. मात्र पाचशेचा भूखंड हा औद्योगिक वापरासाठी रुपांतरित करायचा झाला, तर प्रति चौरस मीटर १० रुपये आकारले जातील.नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी गुरुवारी याविषयी येथे पत्रकारांना सांगितले की, सामान्य माणसाला फटका बसणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. शिवाय जे 1 लाख चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जमिनींचे झोन बदलतात, त्यांच्याकडून सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होईल. अगोदर लोक ऑर्चड जमिनींचे झोन न बदलताच बांधकाम करत होते. ते आता बंद होईल. बंद झाले नाही, तर मोठी कारवाई होईल.मंत्री सरदेसाई म्हणाले, की पाचशे एक ते एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जर कुणाची जागा असेल आणि त्यांना झोन बदलून हवा असेल, तर 50 रुपये प्रति चौरस मीटर दर लागू होईल. मात्र औद्योगिक कारणास्तव झोन बदल हवा असेल, तर प्रति चौरस मीटर 150 रुपये लागू होतील. यासाठी ७ हजार ५०० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. 1 ते 2 हजार चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या जागेसाठी प्रक्रिया शुल्क दहा हजार रुपये आहे. सेटलमेन्ट झोनसाठी प्रति चौरस मीटर 75 रुपये भरावे लागतील. औद्योगिक कारणासाठी झोन बदल करण्यास प्रति चौरस मीटर 150 रुपये भरावे लागतील.  जर कुणी 1 लाख चौरस मीटर जागा ऑर्चडमधून सेटलमेन्ट करत असेल, तर सरकारी तिजोरीत 2 कोटी रुपयांचे शुल्क जमा होईल.  

टॅग्स :goaगोवा