विनयभंगप्रश्नी ‘त्या’ शिक्षकास शिक्षण खात्याकडून नोटीस
By Admin | Updated: December 15, 2015 01:45 IST2015-12-15T01:45:36+5:302015-12-15T01:45:45+5:30
पणजी : सांगे तालुक्यातील एका हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल

विनयभंगप्रश्नी ‘त्या’ शिक्षकास शिक्षण खात्याकडून नोटीस
पणजी : सांगे तालुक्यातील एका हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेतली आहे. खात्याने शिक्षकास नोटीस जारी केली असून येत्या गुरुवारी त्यास सुनावणीसाठी हजर राहण्यास बजावले आहे.
सहलीवेळी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्र्थिनीचा विनयभंग केला. तो मद्याच्या नशेत होता, अशीही चर्चा सुरू आहे. या प्रकरणी हायस्कूल व्यवस्थापनाने शिक्षण खात्याला गेल्या आठवड्यात कल्पना दिली. खात्याने या प्रकाराची दखल घेतली असून सत्य शोधून काढण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्र्थिनीच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती व्यवस्थापनाला दिलेली आहे.
शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी याविषयी ‘लोकमत’ला सांगितले, की व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षक या दोघांनीही येत्या गुरुवारी सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल. सखोल चौकशी केली जाईलच. शिक्षकास सेवेतून निलंबित करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाचा भाग म्हणून आम्हाला सुनावणी घ्यावी लागते. शिक्षक दोषी आढळला, तर त्यास निलंबित करण्यासाठी खात्याकडून व्यवस्थापनास परवानगी दिली जाईल. (खास प्रतिनिधी)