मी नव्हे; अभियंत्यांनी केला घोटाळा!

By Admin | Updated: January 30, 2015 01:26 IST2015-01-30T01:21:25+5:302015-01-30T01:26:18+5:30

चर्चिलचे कानावर हात : ३०० कोटींचा घोटाळा; सीआयडीकडून २ तास चौकशी

Not me Engineer scam scam! | मी नव्हे; अभियंत्यांनी केला घोटाळा!

मी नव्हे; अभियंत्यांनी केला घोटाळा!

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळा प्रकरणात खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची गुन्हा अन्वेषण विभागाने दोन तास चौकशी केली. ३०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात आलेमाव हे प्रमुख संशयित आहेत. या घोटाळ्याशी आपला संबंध नसल्याचा दावा आलेमाव यांनी केला. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटासंबंधीच्या फाईली अधिकारी हाताळत होते. आपली त्यात काहीच भूमिका नाही, असे त्यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
३०० कोटी रुपयांची कंत्राटे विभागून देताना ती २५८ कंत्राटे करण्याची सूचनाही आपण दिली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचाराची शक्यता असल्यासही त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आलेमाव यांच्या या जबाबामुळे या प्रकरणाशी संबंध असलेले अधिकारी अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील दुसरे संशयित, निवृत्त कार्यकारी अभियंते पी. टी. पारकर हे त्यामुळे अडचणीत आले आहेत. दक्षता खात्याने केलेल्या चौकशीनंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सक्तीची निवृत्ती घ्यायला भाग पाडण्यात आले होते. आता सीआयडीच्या चौकशीला त्याला सामोरे जावे लागणार आहे.
हा घोटाळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मडगाव विभागात उघडकीस आला होता. पाणीपुरवठ्यासंबंधीची मोठी कंत्राटे विभागून लहान २५८ कंत्राटे करून निविदा न काढता बहाल करण्यात आली होती. पी. टी. पारकर
हे या कार्यालयाचे अभियंते होते. काँग्रेसचे सध्याचे
प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी या प्रकरणात तक्रार
दाखल केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Not me Engineer scam scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.