जमीन हडप प्रकरणात आपला सहभाग नाही, मनोज परब भाजपचा दलाल - आग्नेल फर्नांडिस
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 21, 2023 16:35 IST2023-10-21T16:33:41+5:302023-10-21T16:35:39+5:30
आपण आमदार २००७ साली झालो व कांदोळी येथील जमीन हडप प्रकरणेही त्यापूर्वीची आहेत. मग आपला त्याच्याशी कुठे संबंध आहे. परब याचा आमदार मायकल लोबो याच्याशी सेटींग आहे. त्यामुळेच ते दोघे एकमेकांविरोधात शब्द काढत नसल्याची टीका त्यांनी केली.

जमीन हडप प्रकरणात आपला सहभाग नाही, मनोज परब भाजपचा दलाल - आग्नेल फर्नांडिस
पणजी - कांदोळी येथील जमीन हडप प्रकरणात आपला सहभाग असल्याचा रेव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी केलेला आरोप खोटा आहे. परब हा भाजपचा दलाल असल्याचा आरोप कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केला.
आपण आमदार २००७ साली झालो व कांदोळी येथील जमीन हडप प्रकरणेही त्यापूर्वीची आहेत. मग आपला त्याच्याशी कुठे संबंध आहे. परब याचा आमदार मायकल लोबो याच्याशी सेटींग आहे. त्यामुळेच ते दोघे एकमेकांविरोधात शब्द काढत नसल्याची टीका त्यांनी केली.
फर्नांडिस म्हणाले, की मनोज परब हा केवळ आरोप करतो. प्रत्यक्षा एकही विषय त्यांनी आतापर्यंत धसास लावलेला नाही. कळंगुट येथील परप्रांतीय तसेच जमीन हडप प्रकरणावरुन त्यांनी आपल्यावर आरोप केले. या आरोपांना कुठलाही आधार नाही. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात तो फारसे आरोप करीत नाही. कारण त्या दोघांचे सेटींग आहे. मनोज परब हे भाजपचे दलाल आहे. त्यांनी आपले काम अगोदर जनतेला दाखवावे. मी तळागळात काम करुन इथ पर्यंत पोहचलो असल्याचे त्यांनी सांगितले.