डिमोशन नव्हे, मोठी जबाबदारी!
By Admin | Updated: November 17, 2014 02:00 IST2014-11-17T01:56:35+5:302014-11-17T02:00:26+5:30
खाते बदलावर श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया

डिमोशन नव्हे, मोठी जबाबदारी!
पणजी : आपले डिमोशनही झालेले नाही आणि आपल्याला मिळालेले खातेही लहान नाही. उलट फार मोठी जबाबदारी दिली आहे, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.
श्रीपाद नाईक यांच्याकडून पर्यटन खाते काढून घेऊन त्याऐवजी आयुष हे नवीन खाते देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाबद्दल नाईक यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती; परंतु खाते बदल हा चांगला असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर वेद-आयुर्वेदाचा संदेश देत आहेत, तर भारतात त्यासाठी भक्कम आर्थिक तरतूद असलेले स्वतंत्र खाते बनवून दृढनिश्चय स्पष्ट करीत आहेत. तसेच या कामासाठी माझ्यावर विश्वास टाकत आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी
अखंड मेहनत मी घेणार आहे.’ खाते बदल करून आपले डिमोशन केल्याचा दावा
त्यांनी फेटाळला आहे.
आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्वशक्तीनिशी पार पाडण्यास प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन खाते असल्यामुळे या क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी करण्याजोग्या आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे. निश्चित
धोरणे ठरवून कृती आराखडाही तयार केला जाईल. नुकताच आपण या खात्याचा
ताबा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)