शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

एनओएसच्या दहावीच्या निकालात मोठा घोळ, 38 विद्यार्थ्यांना दाखवले गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 3:44 PM

गोव्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 38 जणांना गुणपत्रिकेवर गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत.

- वासुदेव पागीपणजी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संचलित राष्ट्रीय ओपन स्कूलच्या (एनओएस) दहावीच्या निकालात मोठा घोळ आढळून आला आहे. गोव्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 38 जणांना गुणपत्रिकेवर गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येणा-या राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून मोठ्या प्रमाणावर गोव्यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोव्यात या विद्यालयाची अनेक अभ्यासकेंद्रे आहेत आणि तीन परीक्षा केंद्रे आहेत. यापैकी कुडचीरे येथील अभ्यास केंद्रात २५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एप्रिलमध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला होता. परंतु त्यात या केंद्रावरील ३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नसल्याचे त्यांच्या गुणपत्रिकेत म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांना दोन विषयात गैरहजर तर काहींना तीन विषयातही गैरहजर म्हणून शेरा देण्यात आला आहे. 

या प्रकारामुळे कुडचिरे विद्यार्थी व पालकही संतापले आहेत. कुडचिरे येथील हेडमास्तर असलेले श्रीकृष्ण नाईक यांना याविषयी विचारले असता त्यांनी गैरहजर म्हणून दाखविण्यात आलेले विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती असे सांगितले. शिवाय तेथील नोंदवहीतही त्या विद्यार्थ्यांची नावे व स्वाक्षरी आहेत. हा विषय पुणे येथील विभागीय कार्यालयात पाठविण्यात आला असून तातडीने हालचाली करून समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुण्याहून नंतर दुरुस्तीचे निकालपत्रही आले आहे. त्यात विनाकारण गैरहजर म्हणून नोंदले गेलेल्या ३८ पैकी १७ विद्यार्थ्यांचा निकाल दुरुस्त करून पाठविण्यात आला आहे. त्यातही पुन्हा आणखी त्रुटी राहिल्या आहेत. जे तीन विषयात गैरहजर दाखविण्यात आले होते ते दुरुस्तीच्या गुणपत्रकात १ विषयात नापास म्हणून दाखविण्याचेही प्रकार घडले आहेत. म्हणजेच दुरुस्तीचा निकालही पुन्हा सदोष पाठवण्यात आला आहे. या विषयी विभागीय सहसंचालक अशोक कुमार आणि एनआयओएस च्या गोवा विभागाचे प्रमुख सुनिल माने  यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उठविला नाही. 

टॅग्स :examपरीक्षा