राजकारणातून निवृत्ती नाही : पर्रीकर
By Admin | Updated: December 14, 2015 01:09 IST2015-12-14T01:07:54+5:302015-12-14T01:09:00+5:30
पणजी : राजकारणातून एवढ्यात निवृत्त होणार नाही. केंद्र्रात दिलेली जबाबदारी पूर्ण करीन आणि गोव्यासाठी केंद्राकडून शक्य

राजकारणातून निवृत्ती नाही : पर्रीकर
पणजी : राजकारणातून एवढ्यात निवृत्त होणार नाही. केंद्र्रात दिलेली जबाबदारी पूर्ण करीन आणि गोव्यासाठी केंद्राकडून शक्य तितका निधीही आणीन, अशी ग्वाही केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कांपाल मैदानावर त्यांच्या षष्ठ्यब्दिपूर्ती कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने जमलेल्या हितचिंतक, कार्यकर्त्यांना रविवारी दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पर्रीकरांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
पर्रीकर म्हणाले की, राजकारणात सहज म्हणून आलो आणि अडकलो. सदैव लोकांबरोबर राहिलो. प्रामाणिकपणा हे तत्त्व मानून काम करीत आलो. चांगले काम करणाऱ्यांना लोक ओळखतात. जनतेने सदोदित प्रेम दिले. (पान २ वर)