शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गोवा; सरकारचं नेतृत्व भाजपाकडेच राहणार, पक्ष निरीक्षकांकडून आमदारांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 9:29 PM

सध्या अस्थिरतेसारखी स्थिती असली तरी, भाजपाच्या सर्व आमदारांनी संघटीत रहावे. विद्यमान सरकारचे नेतृत्व हे भाजपाकडेच राहील, अशी ग्वाही भाजपाच्या सर्व आमदारांच्या शनिवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकाकडून आमदारांना देण्यात आली.

पणजी : सध्या अस्थिरतेसारखी स्थिती असली तरी, भाजपाच्या सर्व आमदारांनी संघटीत रहावे. विद्यमान सरकारचे नेतृत्व हे भाजपाकडेच राहील, अशी ग्वाही भाजपाच्या सर्व आमदारांच्या शनिवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकाकडून आमदारांना देण्यात आली. पक्षाचे केंद्रीय नेते योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतील, असे पक्षाचे संघटनात्मक काम पहाणारे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी बी. एल. संतोष यांनी बैठकीवेळी सांगितले.

येत्या मंगळवारी पक्षाचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात येत आहेत. खनिज खाणींचा विषय हाताळणs हा गडकरी यांच्या भेटीचा प्रमुख हेतू आहे. त्या भेटीची पूर्वतयारी म्हणून बी. एल. संतोष हे शनिवारी गोव्यात आले व त्यांनी बैठका घेतल्या. ते काही माजी व काही विद्यमान आमदारांना व्यक्तीगरित्याही भेटले. भाजपाच्या पणजीतील कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता त्यांनी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत अकरा आमदारांनी भाग घेतला. पर्रीकर यांची प्रकृती कशीही असो पण शेवटपर्यंत सरकारचे नेतृत्व त्यांच्याकडेच रहावे, अशी अपेक्षा काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. मंत्री विश्वजित राणो हे बैठकीला आले नाहीत पण ते बैठकीपूर्वी संतोष यांना स्वतंत्रपणो भेटले व त्यांनी संतोष यांना सद्यस्थितीची माहिती दिली.

राज्यातील राजकीय स्थितीविषयी काहीजण अफवा पसरवत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. कुठलाच दुसरा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. सरकारचे नेतृत्व हे कायम भाजपकडेच राहील. कोणता निर्णय कधी घ्यावा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे बी. एल. संतोष यांनी स्पष्ट केल्याचे आमदारांच्या बैठकीनंतर उपसभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांची प्रकृती बरी आहे, असे पक्षाचे आमदार राजेश पाटणोकर यांनी पत्रकारांना सांगितले.

महामंडळ स्थापन करा खनिज खाणींचा प्रश्न हा तीव्र झालेला आहे. खाणबंदीचा फटका हा चाळीसही मतदारसंघांत बसेल. पर्यटनाला व राज्याच्या आर्थिक स्थितीलाही मार बसेल. यामुळे खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी आम्ही केली. पंतप्रधानांच्या कार्यालयानेही खाणींचा विषय गंभीरपणो घेतला असून काही तरी उपाय केंद्र सरकार निश्चितच काढील. गडकरी हे त्याचसाठी गोव्यात येत आहेत. प्रसंगी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे देखील गोव्यात येतील, असे संतोष यांनी आम्हाला सांगितल्याचे लोबो म्हणाले. खनिज लिजेस सरकारच्या ताब्यात रहावीत व खाणी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत म्हणून आम्ही गोवा सरकारने खनिज महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केल्याचे पाटणोकर यांनी सांगितले. लिलावाला हरकत नाही पण खाणी सरकारकडे किंवा गोमंतकीयांकडे राहिल्या तर स्थानिकांनाच नोकरी  मिळेल, असे पाटणोकर म्हणाले.

संघटना नेस्तनाबूत पक्षाच्या संघटनेचे काम ठप्प होण्याची गरज नाही पण ते सध्या ठप्प झाले आहे, असे काही माजी आमदारांनी बी.एल. संतोष यांना स्वतंत्रपणो भेटून सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यसभा खासदारपद हे एकाच नेत्याकडे आहे. खासदार झाल्यानंतर विनय तेंडुलकर यांना दिल्लीत वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गोव्यातील पक्ष कामावर परिणाम होतो. दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमला जावा, असा मुद्दा एका माजी आमदाराने संतोष यांच्याकडे मांडला. मुख्यमंत्री आजारी असल्याने सरकार ठप्प झाले हे समजता येते पण पक्ष संघटना ठप्प होण्याची गरज नाही असे मत त्या माजी आमदाराने व्यक्त केल्याचे सुत्रंनी स्पष्ट केले.