तियात्रावर सेन्सॉर नको : चर्चिल
By Admin | Updated: February 17, 2015 02:26 IST2015-02-17T02:23:50+5:302015-02-17T02:26:05+5:30
मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप

तियात्रावर सेन्सॉर नको : चर्चिल
मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप
घेतला असून असे केल्यास
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी होईल, तसेच कोकणी समाजावरही एक प्रकारचा अन्याय होईल, असा दावा केला.
कोकणी तियात्र हा समाजमनाचा आरसा असून कित्येकवेळा त्यातून समाजप्रबोधनही होते. कित्येकदा तियात्रांतून राजकारण्यावर टीका करणारी गीते गायिली जातात. सध्याच्या सरकारवरही तियात्रातून टीका केली जाते. ही टीका सहन होत नसल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक अशी गीते आपल्यावरही गायिली गेली आहेत. मात्र, आपण कधीही त्यास विरोध केला नाही. कुठल्याही तियात्रात बदनामीकारक गीत म्हटल्यास त्याच्या विरोधात न्यायालयात दावा करता येतो. मात्र, सेन्सॉर आणून तियात्रिस्तांचा आवाज बंद करणे कुठल्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखे नाही, असे ते म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजप सरकार या निवडणुका पक्ष पातळीवर घेऊन लोकशाहीचा खून करण्यास सरसावले आहे.
उमेदवाराचा आवाज दडपण्यासाठी ही चाल खेळली जाते. अशा सरकारला आता लोकांनीच धडा शिकवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)