मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयातील आव्हान याचिकेवर ६ रोजी निवाडा

By Admin | Updated: May 7, 2014 17:45 IST2014-05-06T18:02:55+5:302014-05-07T17:45:53+5:30

मडगाव : मारहाण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविल्याबद्दल सत्र न्यायालयात गुदरलेल्या आव्हान याचिकेवर मंगळवारी अंतिम युक्तिवाद झाला. याबाबतचा निवाडा ६ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

Niwada on appeal petition challenging Sessions Court | मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयातील आव्हान याचिकेवर ६ रोजी निवाडा

मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयातील आव्हान याचिकेवर ६ रोजी निवाडा

मडगाव : मारहाण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविल्याबद्दल सत्र न्यायालयात गुदरलेल्या आव्हान याचिकेवर मंगळवारी अंतिम युक्तिवाद झाला. याबाबतचा निवाडा ६ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.
शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने कुंकळ्ळी येथील सुरेंद्र देसाई याला भादंंसंच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्राने जखमी करणे), कलम ४२७ (नुकसानी करणे), कलम ५0४ (शिवीगाळ करणे) या गुन्ह्यांबद्दल दोषी ठरवून एक वर्ष कैद व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावली होती. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिने कैद, अशी शिक्षेमध्ये तरतूद होती.
या निवाड्याला सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांच्या कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी गंभीर जखमी झालेली सिंधु देसाई, तिचा पती महादेव यांच्याविषयी एका साक्षीदाराने या घटनेची सविस्तर माहिती आपल्या जबानीत दिली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाबा गावकर यांची साक्षही महत्त्वपूर्ण असून त्या दिवशी आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो, हा आरोपीचा दावा तकलादू असल्याचे आपल्या युक्तिवादात सरकारी वकील सुभाष देसाई यांनी सांगितले.
मतदान अल्पवेळेत करता येते. इतर वेळी असे कृत्य करणे सहज शक्य असून संशयितातर्फे सादर केलेल्या पुराव्यात, इतर बाबींचा तपशील नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.
फिर्यादीने पूर्ववैमनस्यातून ही खोटी तक्रार दाखल केली असून सर्व साक्षीदारांचा पुरावा विश्वास ठेवण्याजोगा नसल्याचा युक्तिवाद ॲड. राजीव गोमीस यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नायणी-कुंकळ्ळी येथे १४ फेब्रुवारी २0१0 रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. फिर्यादी सिंधु देसाई हिचे लाकडी कुंपण मोडण्यात आले. याबाबत जाब विचारला असता सुरेंद्र देसाई याने कुंपणाचा एक लाकडी दांडा काढून तिच्या डोक्यावर मारला होता. त्यात ती जखमी झाली होती. संशयिताने तिला अर्वाच्च शिवीगाळही केली होती. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक गौतम साळुंके यांनी तपासकाम केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Niwada on appeal petition challenging Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.