शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election Result 2022: गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? प्रमोद सावंत दिल्लीला रवाना; भाजपमधील शीतयुद्ध शमणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:13 IST

गोवा भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर प्रमोद सावंत यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

पणजी: गोवा विधासभा निवडणुकांचा निकाल (Goa Election Result 2022) भाजपच्या बाजूने लागला. भाजपने गोव्यात निर्भेळ यश मिळवत २० जागा जिंकल्या. भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले असून, अन्य अपक्ष उमेदवारांनीही पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. यातच गोवा विधानसभेत सर्व नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यावेळी हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती. यानंतर आता प्रमोद सावंत दिल्लीला रवाना होऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वात भाजपने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत असताना विश्वजित राणे (vishwajit rane) यांनी प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिल्याने आता गोवा भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निकाल लागून पाच दिवस उलटले तरी भाजपला गोव्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही. 

राणे आणि सावंत वाद दिल्ली दरबारी

विश्वजित राणे यांच्यातील शीतयुद्ध दिल्ली दरबारी पोहोचला आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून, गोव्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद जाते की विश्वजीत राणे यांना संधी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याची चर्चा आहे. 

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांच्याकडे सूत्रे सोपवून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये १७ आमदारांनी इंग्रजी, १५ जणांनी कोकणी, तर ७ आमद‍ारांनी घेतली मराठीतून शपथ घेतल्याची माहिती मिळाली आहे. तत्पूर्वी, निवडणूक निकालानंतर प्रमोद सावंत पहिल्यांदाच दिल्लीला जात असून, यावेळी भाजपच्या अन्य नेत्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, गोव्यात भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठीचे बहुमत आहे. भाजपचे २०, अपक्ष ३ आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ असे एकूण २५ आमदारांचे संख्याबळ पक्षाकडे आहे. मात्र, नवनिर्वाचित आमदार आणि माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शीतयुद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.  

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंत