शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला नवे पंख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 07:33 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात ५ प्रादेशिक वैद्यकीय पर्यटन केंद्रे, गाइडना प्रशिक्षणाचा समावेश, फार्मा सेक्टरलाही मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्यटनाला बळ देण्यासाठी २०२६-२७च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी ५ प्रादेशिक हब जाहीर केले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी ही संस्था स्थापन केली जाईल. तसेच वीस महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळी १० हजार गाइडना प्रशिक्षण दिले जाईल. नॅशनल डेस्टिनेशन नॉलेज ग्रीडवर सर्व पर्यटनस्थळांचे मॅपिंग केले जाईल.

सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) मेडिकल टुरिझम हबवर भर दिला. वैद्यकीय संशोधनाला प्रोत्साहन, आयुष केंद्रे, आरोग्यसेवांची उपलब्धता याद्वारे वैद्यकीय पर्यटन वाढवले जाईल. अर्थसंकल्पात पर्यटनाला रोजगार आणि विकास धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवले. पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती, परकीय चलन कमाई आणि स्थानिक आर्थिक विकास याला प्राधान्य दिले आहे.

सोळाव्या वित्त आयोगाने गोव्याला १,०४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नगरपालिका वगैरे शहरी स्थानिक स्वराज संस्थांसाठी ७२६ कोटी, ग्रामपंचायती आदी ग्रामीण स्वराज संस्थांना १७४ कोटी, तर आपत्ती व्यवस्थापनासाठी १४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. वेगवेगळ्या राज्यांना मिळून १६ व्या वित्त आयोगाने एकूण १.४ लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत व असे करताना ४१ टक्के करवाटप कायम ठेवले आहे. या निधीमुळे राज्यांना स्थानिक पातळीवर विकासकामे अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत. २०२६ ते २०३१ या पाच वर्षांसाठी आयोगाचा अहवाल संसदेत सादर झाला. शेजारी महाराष्ट्रासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी ३९,४९२ कोटी, कर्नाटकला ८,५५९ कोटी मंजूर केले आहेत.

नारळ संवर्धन योजना

नारळ उत्पादन क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये खराब झालेल्या माडांच्या जागी नव्या व अधिक उत्पादनक्षम जातींची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे गोव्यातील पारंपरिक नारळ उत्पादकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

गोव्यासाठी काय ठरले उपयुक्त?

पर्यटन क्षेत्रासाठीही काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशभरात १० हजार पर्यटन गाईड्सना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच नवीन मेडिकल टुरिझम हब्स उभारण्यात येणार आहेत. गोवा पर्यटनाच्या दृष्टीने अग्रगण्य राज्य असल्याने, या योजनांचा अप्रत्यक्ष लाभराज्याला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काजू उद्योगाला फायदा

याशिवाय, २०३० पर्यंत काजू व नारळ उत्पादन तसेच प्रक्रियेत भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा केंद्र सरकारचा मानस असून, निर्यात वाढवण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. याचा फायदा गोव्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला होऊ शकतो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Boost for Goa Tourism: New Central Schemes Announced in Budget

Web Summary : Central budget boosts Goa tourism with medical hubs, guide training, and destination mapping. Financial aid includes funds for local bodies and disaster management. Coconut and cashew sectors also get a boost, potentially benefiting Goan industries.
टॅग्स :goaगोवाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2026Budgetअर्थसंकल्प २०२६State Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार