शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 19:22 IST

पूजा नाईक व डॉरीस टेक्सेरा यांच्यात कांटे की टक्कर; भाजपाची भूमिका अस्पष्ट

 

मडगाव: सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मडगावच्या नवीन नगराध्यक्ष कोण होतील याचा फैसला आज 22 नोव्हेंबरला होणार असून गोवा फॉरवर्डच्या पूजा नाईक व काँग्रेसच्या डॉरीस टेक्सेरा यांच्यात होणारी ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भाजपाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्याने या निवडणुकीतील उत्कंठा अजुनही ताणून राहिलेली आहे.

काँग्रेसच्या डॉरीस टेक्सेरा यांनी गुरुवारी काँग्रेसप्रणीत सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत आपले दोन उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्याकडे सुपूर्द केले. यापैकी एका अर्जाला अविनाश शिरोडकर यांनी तर दुसऱ्या अर्जाला दीपा शिरोडकर यांनी अनुमोदन दिले आहे. हे उमेदवारी अर्ज भरताना या तिन्ही नगरसेवकांशिवाय मनोज मसुरकर, शरद प्रभूदेसाई व दामू नाईक हे अन्य नगरसेवक उपस्थित होते.

विजयासाठी आवश्यक असलेले नगरसेवक आपल्याबरोबर रहातील असा विश्र्वास यावेळी टेक्सेरा यांनी व्यक्त केला. मडगाव पालिकेत एकूण 25 नगरसेवक असून  त्यापैकी 12 नगरसेवकांचा पूजा नाईक यांना पाठिंबा आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक टेक्सेरा यांच्यामागे  उभे रहातील. भाजपाच्या राहिलेले पांच नगरसेवक कुठल्या बाजूने मतदान करतील त्यावर निकाल अवलंबून रहाणार आहे. भाजपाचे नगरसेवर रुपेश महात्मे यांना यासंदर्भात विचारले असता, आमची रणनिती आम्ही मतदानाच्यावेळीच उघड करु असे ते म्हणाले.आज 11 वाजता नवीन नगराध्यक्ष निवडून काढण्यासाठी बैठक होणार असून पणजी महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रीगीस हे यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा