शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 07:39 IST

जगभरातील पर्यटकांचा ओढा असलेले गोवा राज्य सध्या दारू, ड्रग्ज, ध्वनिप्रदूषण, बेकायदेशीर पार्त्या आणि नियमबाह्य वर्तन या गोष्टींमुळे अधिक गाजते आहे.

सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा

शांत व सुंदर राज्य अशी गोव्याची जगभर ख्याती. वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक गोवा राज्याला भेट देऊन जातात. नववर्ष साजरे करण्यासाठी तर एक कोटीहून अधिक पर्यटक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात असतात. फेसाळणाऱ्या लाटा, स्वस्त मिळणारे मद्य, युरोपियन संस्कृतीचा पगडा असलेली किनारी भागातील जीवनशैली यामुळे जगभरातील पर्यटक ह्या चिमुकल्या राज्याच्या प्रेमात पडतो. मात्र अलीकडे देशी व विदेशी पर्यटक गोव्यात धिंगाणा घालू लागलेत. उपद्रव निर्माण करू लागलेत. यामुळे स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष उभा राहू लागला आहे.

गेल्याच आठवड्यात उत्तर गोव्यात भीषण वाहन अपघात झाला. त्या एका अपघातात तिघे पर्यटक जागीच ठार झाले. अपघाताला कारण ठरलेला वाहनचालक विदेशी पर्यटक होता. दर दोन महिन्यांनी पर्यटकांचे अपघात सुरूच असतात. वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जाते. उधाणलेला समुद्र आयुष्यात प्रथमच पाहणारे अनेक देशी पर्यटक स्वतःला पाण्यात झोकून देतात. काहीजण दुपारी मद्य प्राशन करून स्नान करण्यासाठी समुद्राच्या जबड्यात शिरतात व मरण पावतात.

पर्यटकांना आवरणे गोवा पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले आहे. दारू पिऊन वाहन चालवू नका, अशी सूचना हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यटकांना केली जाते. पोलिसांकडूनही तसेच पर्यटकांना बजावले जाते. मात्र अनेकदा तरुण पर्यटक ऐकत नाहीत.

गोव्यात 'रेन्ट अ कार' व 'रेन्ट अ बाइक'ची पद्धत आहे. भाड्याने चारचाकी व दुचाकी वाहने मिळतात. जिवाचा गोवा करावा अशा हेतूने पर्यटक वागतात. हेल्मेट न घालता दुचाकी चालवली जाते. वन वेमध्ये गाडी हाकली जाते. समुद्रकिनाऱ्यांवर वाहन चालविता येत नाही, त्यासाठी मोठा दंड असतो हे ठाऊक असूनही थ्रील म्हणून चक्क वाळूमध्ये चारचाकी नेली जाते. किनान्यांवरून स्थानिक व पर्यटक फिरत असतात. तिथेच चारचाकी वाहन मुद्दाम नेऊन नियमभंग केला जातो. उत्तर गोव्याच्या किनारी भागात या महिन्याच्या अखेरीस सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल होणार आहे. जगभरातून हजारो पर्यटक त्यात सहभागी होतील. या शिवाय विविध क्लब व पबकडून पाट्यांचे आयोजन केले जाईल. त्याबाबतची तयारी जोरात सुरू आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी बॉलिवूड स्टार, राष्ट्रीय ख्यातीचे काही क्रीडापटू, देशातील अनेक बड़े उद्योगपती, राजकीय नेते गोव्यात येणार आहेत.

नाताळ व नववर्ष पार्टी म्हणजे गोव्यात मोठी धूम असते. सध्या उत्तर व दक्षिण गोव्याची किनारपट्टी त्यासाठी नव्या नवरीप्रमाणे सजू लागली आहे. रोषणाईची सुरुवात होऊ लागली आहे. अशावेळी पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात हैदराबादचे तिघे पर्यटक अपघातात ठार झाल्यानंतर पोलिसांनी पर्यटक वाहनांविरुद्ध तसेच मद्यपी चालकांविरुद्ध कडक भूमिका घेणे सुरू केले आहे.

गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करण्यास बंदी आहे; पण पर्यटकांकडून मिरामार, दोनापावल, बागा, कळंगूट अशा ठिकाणी उघड्यावर स्वयंपाक केला जातो. शेतात खाद्यपदार्थ शिजविले जातात. याविरुद्धही दंडात्मक कारवाई पोलिस करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी आहे; पण रस्त्याच्या बाजूला उघड्यावर बसून बिअर व अन्य दारू पिणारे पर्यटक कमी नाहीत. पणजीत हे चित्र जास्त दिसते. फुटपाथवरच मग दारूच्या बाटल्या टाकल्या जातात किंवा रस्त्याकडेलाच त्या बाटल्या फोडल्या जातात. अशा पर्यटकांविरुद्धही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

ड्रग्जच्या अतिसेवनाने गोव्यात पर्यटकांचा मृत्यू होत आहे. मध्यंतरी हरयाणामधील टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण देशाचे लक्ष गोव्याच्या ड्रग्ज धंद्याकडे गेले होते. ध्वनिप्रदूषण करून पर्यटक पार्यो करतात. यामुळेही वाद निर्माण होत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणारे पर्यटक ही तर मोठी डोकेदुखी झाली असल्याचे पोलिसही मान्य करतात.

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन