अब्रुनुकसानीच्या खटल्यामुळे होते तणावाखाली : राष्ट्रवादी
By Admin | Updated: November 13, 2015 02:14 IST2015-11-13T02:14:30+5:302015-11-13T02:14:41+5:30
पणजी : भ्रष्टाचार तसेच पर्यावरण संहाराविरुद्ध नेहमी लढा देणारे फा. बिस्मार्क डायस हे त्यांच्याविरुद्ध १ कोटी रुपये

अब्रुनुकसानीच्या खटल्यामुळे होते तणावाखाली : राष्ट्रवादी
पणजी : भ्रष्टाचार तसेच पर्यावरण संहाराविरुद्ध नेहमी लढा देणारे फा. बिस्मार्क डायस हे त्यांच्याविरुद्ध १ कोटी रुपये अब्रुनुकसानीचा खटला दाखल केल्याने तणावाखाली होते. खटला दाखल करणारी व्यक्तीच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष ट्रोजन डिमेलो यांनी केला आहे. या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी करावी,
अशी मागणी त्यांनी केली.
येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत डिमेलो म्हणाले की, फा. डायस हे नेहमीच सरकारशी लढले. त्यामुळे चौकशीच्या बाबतीत सरकार त्यांना न्याय देऊ
शकणार नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. तियात्रिस्तांवर हल्ले होताहेत. न्यायालयाचे आदेश धुडकावले जात आहेत. ज्या गोष्टी कायदेशीरपणे करता येत नाहीत, त्या बेकायदेशीरपणे केल्या जात आहेत.
ते म्हणाले, सांतइस्तेव्हमध्ये बांधाच्या दुरुस्तीच्या नावाखाली जे गैरव्यवहार
चालले होते त्याविरुद्ध बिस्मार्क यांनी आवाज उठविल्याने त्यांनी अनेकांचे शत्रुत्व घेतले होते. या (पान २ वर)