शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अन् त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 21:17 IST

गोव्याचे माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डी’सोझा यांना तसेच त्यांच्या पत्नी नेनी डी’सोझा त्यांच्या दोन मुली व एका मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.

वास्को: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डी’सोझा यांच्यासहीत त्यांच्या पत्नी नेनी डी’सोझा व तीन मुलांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने शुक्रवारी (दि.१७) त्यांना ‘मडगाव रेसिडेंन्सी’ मध्ये दाखल करण्यात आले आहे. जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांना मागच्या दिवसात ताप यायला लागल्याने त्यांनी कोरोनाबाबत चाचणी केली असता त्यांचा अहवाल ‘पोझेटीव्ह’आला आहे.

गोव्याचे माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डी’सोझा यांना तसेच त्यांच्या पत्नी नेनी डी’सोझा त्यांच्या दोन मुली व एका मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांना संपर्क केला असता जुझे फीलीप डी’सोझा यांच्यासहीत त्यांच्या घरातील एकूण पाच सदस्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पोझेटीव्ह’ आलेला असल्याची माहीती त्यांनी दिली. जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना मागच्या दिवसात ताप येण्यास सुरवात झाल्याने त्यांची कोरोनाबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्यात आले होते. यानंतर त्यांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल ‘पोझेटीव्ह’ आल्याने शुक्रवारी त्यांना मडगाव येथे दाखल करण्यात आल्याची माहीती डॉ. बोरकर यांनी दिली. काही दिवसापूर्वी जुझे फीलीप डी’सोझा यांचे मोठे भाऊ तथा मुरगाव नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक पाश्कॉल डी’सोझा (वय ७२) यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी पाश्कॉल डी’सोझा यांचा इस्पितळात कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. पाश्कॉल यांच्या कुटूंबातील अन्य काही सदस्यांनाही कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वास्कोचे माजी आमदार जुझे फीलीप डी’सोझा यांना तसेच त्यांच्या घरातील इतर चार सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहीती शुक्रवारी वास्को शहरात पसरताच अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. जुझे फीलीप डी’सोझा यांच्या पत्नी नेनी डी’सोझा या मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. डी’सोझा व त्यांचे कुटूंब लवकरात लवकर ठीक होऊन घरी परतावे अशीच आमची प्रार्थना असल्याचे अनेकांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य लवकरच ठीक होऊन घरी परतावे अशी देवाशी प्रार्थना असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या