काँग्रेसशी राष्ट्रवादीची युती शक्य : डिसोझा
By Admin | Updated: November 27, 2015 01:27 IST2015-11-27T01:26:53+5:302015-11-27T01:27:10+5:30
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही समविचारी पक्षाशी युती करण्यास तयार आहे

काँग्रेसशी राष्ट्रवादीची युती शक्य : डिसोझा
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही समविचारी पक्षाशी युती करण्यास तयार आहे. काँग्रेस पक्षाशीदेखील युती होऊ शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीवेळी स्वतंत्रपणे चाळीसही जागा लढविल, अशी भूमिका यापूर्वी दिग्विजय सिंग व प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी मांडली आहे.
याविषयी जुझे फिलिप यांना प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की राज्यातील सर्र्व धर्र्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे. अपक्ष आमदारांशी युती होऊ शकत नाही; पण राजकीय पक्षांशी युती होऊ शकते. काँग्रेस असो किंवा अन्य कोणता पक्ष असो, जो धर्र्मनिरपेक्ष तत्त्व मानतो अशा पक्षाशी युती करण्यास आम्ही तयार आहोत. निवडणुका जाहीर होतील, त्या वेळी युतीची प्रक्रिया सुरू होईल.
बिहारप्रमाणेच गोव्यातही आघाडी स्थापन व्हायला हवी.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व उत्तर गोव्यातील सर्व मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख देवानंद नाईक यांनीही आपण जुझे फिलिप डिसोझा यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले.
विविध धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या तर सत्ता दूर नाही. धर्मनिरपेक्ष तत्त्व मानणाऱ्या पक्षांशी आम्ही हातमिळवणी करण्यास तयार आहोत. २०१२ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा काँग्रेस पक्षाने दिल्या होत्या, असे नाईक म्हणाले.
(प्रतिनिधी)