नौदलाचे हेलिकॉप्टर वापरलेच नाही : जेटली
By Admin | Updated: December 28, 2014 09:38 IST2014-12-28T09:33:39+5:302014-12-28T09:38:10+5:30
पणजी : गोव्यात आपल्या कुटुंबीयांनी नौदलाचे हेलिकॉप्टर वापरलेच नाही, त्याविषयी चुकीची माहिती काहीजणांकडून दिल्याचे सांगत शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ते वृत्त फेटाळून लावले आहे.

नौदलाचे हेलिकॉप्टर वापरलेच नाही : जेटली
पणजी : गोव्यात आपल्या कुटुंबीयांनी नौदलाचे हेलिकॉप्टर वापरलेच नाही, त्याविषयी चुकीची माहिती काहीजणांकडून दिल्याचे सांगत शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ते वृत्त फेटाळून लावले आहे.
जेटली हे गेल्या २३ रोजी एका खासगी कामानिमित्त गोवा भेटीवर आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी नौदलाचे हेलिकॉप्टर गोव्यात वापरल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केली होती. त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांमध्येही वृत्त झळकले व सोशल मीडियावरही त्या तक्रारीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर जेटली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुळात आपली मुलगी गोव्यात आलीच नव्हती. आपली पत्नी व मुलगा मात्र गोव्यात होता, त्यांनी नौदलाचे हेलिकॉप्टर वापरलेच नाही. त्यामुळे त्याविषयीचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे. आपण गोवा भेटीवर आलो असल्याची कल्पना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनादेखील नव्हती; कारण ती पूर्णत: खासगी भेट होती, असे जेटली यांनी म्हटले आहे. कुठल्याच सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारे खोटी गोष्ट सांगण्याचा अधिकार नाही, असे जेटली यांनी म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)