शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

मोपा विमानतळ प्रकल्पाच्या कामावर निरी लक्ष ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 3:37 PM

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

पणजी : शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम येत्या दहा दिवसांत नव्याने सुरू होणार आहे. जीएमआर ही कंत्रटदार कंपनी त्यासाठी पूर्वतयारी करू लागली आहे. मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, जैवविविधतेवर परिणाम होऊ नये तसेच सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या अटींचे पालन व्हावे या हेतूने निरी संस्था बांधकामावर लक्ष ठेवणार आहे.

राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने मोपा विमानतळासाठीच्या पर्यावरणविषयक दाखल्यावरील (ईसी) निलंबन उठविले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नव्याने काम सुरू होण्यास हरकत नाही असे एका अधिकाऱ्यानेन सांगितले. मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने 85 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे भूसंपादन काही वर्षापूर्वी केले.

विमानतळाला जोडणारा एक नवा मार्गही बांधला जाणार आहे. विमानतळावर दोन धावपट्टय़ा असतील. सध्या एक धावपट्टी व टॅक्सी वे बांधली जाईल. एकदा मोपा विमानतळ उभा राहिल्यानंतर गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल, असे सरकारला वाटते. विमानतळ चालविताना कंत्रटदार कंपनीला जेवढा महसुल मिळेल,त्यापैकी 36 टक्के महसुल सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.

दरम्यान, विमानतळ बांधताना किती प्रमाणात झाडे कापायची आणि किती नवी झाडे लावायची हे ठरलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईसीचे निलंबन जरी मागे घेतले तरी, पर्यावरण व जैवविविधता राखण्याच्यादृष्टीने अनेक सूचना न्यायालयाने केल्या आहेत. गोवा सरकारला व जीएमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला या सूचनांचे पालन करावे लागेल. हे पालन नीट केले जाते की नाही यावर निरी संस्था देखरेख ठेवील.

टॅग्स :goaगोवाenvironmentपर्यावरण