गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाईक यांचे प्रयत्न
By Admin | Updated: May 14, 2017 04:58 IST2017-05-14T04:58:14+5:302017-05-14T04:58:14+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आ. रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे

गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाईक यांचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आ. रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता प्रदेशाध्यक्षपदी राहणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळविणे नाईक यांनी सुरू केले आहे. बहुतेक आमदारांनी नाईक यांच्यासाठी अनुकूलताही दाखवली आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका येत्या महिन्यात सुरू होत आहेत. सदस्य नोंदणी मोहीम १५ मेपर्यंत संपवावी असे ठरले होते; पण पक्षश्रेष्ठींनी त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आपल्याला प्रदेशाध्यक्षपद नको, रवी नाईक यांना ते दिले तर आपली हरकत नसेल, असे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांना कळवल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. चेल्लाकुमार हे तीन दिवसांची गोवा भेट आटोपून शनिवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले.
मोन्सेरात यांची ऐनवेळी माघार?
बाबूश मोन्सेरात हे आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढेनच,
असे चित्र निर्माण करत असले, तरीदेखील त्यांनी ऐनवेळी माघार घेतली, तर आपण काय करावे, याविषयीही काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झालेले आहे.