शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन क्रुझ लायनर जहाज मुरगाव बंदरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 20:10 IST

तब्बल २0३७ विदेशी पर्यटकांना घेऊन एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन हे महाकाय क्रुझ लायनर जहाज रविवारी मुरगाव बंदरात दाखल झाले आहे.

पणजी : तब्बल २0३७ विदेशी पर्यटकांना घेऊन एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन हे महाकाय क्रुझ लायनर जहाज रविवारी मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. या जहाजावर ९७५ खलाशी व कर्मचारी आहेत. मुरगाव बंदरात पाचव्यांदा हे जहाज आलेले आहे. या मोसमात आतापर्यंत एकूण १९ क्रुझ लायनर जहाजे या बंदरात आली. पर्यटन विकास महामंडळाच्या अधिका-यांनी एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशनवरील पाहुण्यांचे स्वागत केले. प्राप्त माहितीनुसार या जहाजातून आलेल्या विदेशी पर्यटकांमध्ये ग्रेट ब्रिटनचे ९८५, आॅस्ट्रियाचे २३0, इंडोनेशियाचे १७२ तर मूळ भारतीय परंतु विदेशात स्थायिक असलेल्या १७४ जणांचा समावेश आहे. ई-लँडिंगची सुविधा देऊन या सर्व पर्यटकांच्या इमिग्रेशनचे सोपस्कार तात्काळ पार पाडण्यात आले.मुरगाव बंदराच्या क्रुझ टर्मिनलवर १0 इमिग्रेशन कक्ष कार्यरत आहेत. पाहुण्यांनी नंतर गोव्यातील पुरातन मंदिरे, चर्च, किनारे आदी पर्यटनस्थळांना भेट दिली. आज सायंकाळीच हे जहाज मुंबईकडे प्रयाण करणार आहे. चालू महिन्यात आणखी पाच मोठी क्रुझ लायनर जहाजे विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात येणार आहेत. राज्यातील पर्यटन व्यवसायासाठी क्रुझ लायनर जहाजे फायदेशीर ठरत आहेत. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे ३0 लाख देशी व १0 लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. विदेशी पाहुण्यांची साधारणपणे मार्च अखेरपर्यंत वर्दळ असते त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात देशी पर्यटक गोव्याच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी करीत असतात.

टॅग्स :goaगोवा