‘मुथुट फायनान्स’मध्ये युवकाचा धिंगाणा
By Admin | Updated: December 4, 2014 01:19 IST2014-12-04T01:16:13+5:302014-12-04T01:19:09+5:30
मडगाव : कुंकळ्ळीतील मुथुट फायनान्स या खासगी वित्त कंपनीच्या शाखेत बुधवारी दुपारी एका युवकाने धुमाकूळ घातला. शाखेच्या महिला मॅनेजरला

‘मुथुट फायनान्स’मध्ये युवकाचा धिंगाणा
मडगाव : कुंकळ्ळीतील मुथुट फायनान्स या खासगी वित्त कंपनीच्या शाखेत बुधवारी दुपारी एका युवकाने धुमाकूळ घातला. शाखेच्या महिला मॅनेजरला धमकावून सर्व रक्कम देण्याची मागणी दिली. अटकाव करणाऱ्या मॅनेजर व सुरक्षा रक्षकाला त्याने मारहाणही केली. दरम्यान, आराडाओरडा झाल्यामुळे पळून जाताना पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने तो जखमी झाला.
रेमंड बार्रेटो (३६) असे या संशयिताचे नाव असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. या घटनेत व्यवस्थापक दिव्या नाईक या जखमी झाल्या असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिसिओत दाखल केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे हे या प्रकरणी तपास करत असून जखमीचा जबाब नोंदविला आहे.
दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेमंड हा मासकोणी-कुंकळ्ळी येथील रहिवासी आहे. दुपारी जेवणाची सुट्टी असल्याने या शाखेतील कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेले होते. ही संधी साधून रेमंड आत शिरला. हेल्मेट घालून आत शिरलेल्या रेमंडच्या हातात सुरी व दंडुकाही होता.
शाखेत व्यवस्थापक दिव्या नाईक व दरवाजाकडे सुरक्षा रक्षक दत्ता शेटये हे होते. काही कळण्याच्या आतच रेमंड दिव्या नाईक यांच्या केबिनकडे पोहोचला व ‘सर्व रक्कम द्या,’ असे धमकावू लागला. (पान ४ वर)