‘परफ्युम स्पेशालिस्ट’चा खून

By Admin | Updated: October 8, 2016 04:41 IST2016-10-08T04:41:44+5:302016-10-08T04:41:44+5:30

परफ्युम स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या मोनिका गुराडे (३९) हिचा निर्घृण खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.

The murder of 'perfume specialist' | ‘परफ्युम स्पेशालिस्ट’चा खून

‘परफ्युम स्पेशालिस्ट’चा खून


पणजी (गोवा) : परफ्युम स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या मोनिका गुराडे (३९) हिचा निर्घृण खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पणजीपासून ६ किलोमीटरवरील पर्वरी परिसरात ही घटना घडली.
पर्वरीतील बेलाविस्ता-सांगोल्डा येथे सपना राज वेली निवासी संकुल आहे. त्यातील जास्मीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २मध्ये मोनिका राहत होत्या. हात-पाय बांधलेल्या स्थितीत, नग्नावस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यांच्यावर बलात्कार करून खून केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोनिका या पतीसोबत दुरावा निर्माण झाल्यानंतर जुलै २०१६पासून येथे भाड्याने राहत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मोलकरीण साफसफाई आणि स्वयंपाक बनविण्यासाठी आली तेव्हा मोनिका यांनी दार उघडले नाही. तिने मोबाइलवरून मोनिका यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मोलकरणीने मोनिका यांच्या मुंबईतील भावाशी संपर्क साधून वस्तुस्थितीची कल्पना दिली. मोनिका यांच्या भावाने मोनिकाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला फोन करून चौकशीची विनंती केली. शेजारच्या महिलेने मोनिका यांच्या पतीला बोलावून फ्लॅटचे दार उघडल्यावर सर्वांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of 'perfume specialist'