मनपा कामगारांचा संपाचा इशारा

By Admin | Updated: June 10, 2015 01:02 IST2015-06-10T01:02:13+5:302015-06-10T01:02:28+5:30

पणजी : महापालिकेच्या कामगारांची वेतन वाढीची मागणी यापूर्वीच सरकारतर्फे मंजूर करण्यात आली. मात्र, त्याची रितसर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होत नाहीत.

Municipal workers' strike | मनपा कामगारांचा संपाचा इशारा

मनपा कामगारांचा संपाचा इशारा

पणजी : महापालिकेच्या कामगारांची वेतन वाढीची मागणी यापूर्वीच सरकारतर्फे मंजूर करण्यात आली. मात्र, त्याची रितसर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होत नाहीत. या आठवड्यात महापालिकेने कामगारांच्या वेतनाबाबत निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांतर्फे देण्यात आला आहे.
या संदर्भात कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून मनपाच्या कामगारांचे वेतन वाढविण्यात आले नाही. कामगारांवर हा अन्याय आहे. कमी वेतनात काम करणारे कामगारही याचा भाग असून वाढणाऱ्या महागाईशी त्यांनाही सामना करावा लागतो. कामगारांना ४0९ रुपये वेतन दरवाढीची मागणी सरकारतर्फे मान्य करण्यात आली होती. मात्र, मनपा याला राजी नाही. आयुक्त संजित रॉड्रिग्स व महापौर शुभम चोडणकर यांच्यामुळे मनपा कामगारांना त्रास सहन करावे लागत आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal workers' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.