महापालिका-कर्मचारी वाद विकोपास

By Admin | Updated: July 8, 2015 01:41 IST2015-07-08T01:41:30+5:302015-07-08T01:41:38+5:30

पणजी : शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख तथा कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासह पणजी महापालिकेच्या ३१५ कर्मचाऱ्यांना पणजी पोलिसांकडून

Municipal-employee dispute | महापालिका-कर्मचारी वाद विकोपास

महापालिका-कर्मचारी वाद विकोपास

पणजी : शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख तथा कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासह पणजी महापालिकेच्या ३१५ कर्मचाऱ्यांना पणजी पोलिसांकडून अटक करण्यात आली. कर्मचाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी, राणे यांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे.
पणजी पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सुरू असलेला संप एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. सोमवारी महापालिकेत कचरा टाकण्याच्या घटनेनंतर मंगळवारी बेकायदेशीरपणे जमाव करण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना पणजी पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटक करून त्यांना कळंगुट येथील पोलीस स्थानकातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले व नंतर जामिनावर सोडण्यात आले.
पालिका कामगारांना कळंगुट येथे नेण्यात आल्यामुळे राणे हे कळंगुट पोलीस स्थानकात गेले होते. तेथेच त्यांना पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी अटक करून पणजीत नेले. त्यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांचे वकील कृष्णा नाईक यांनी केला आहे.
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही कामगारांनी कचरा न उचलल्यामुळे कचरा साठून दुर्गंधी पसरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal-employee dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.