प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरसह मनपात सहा पदांची कंत्राटी भरती
By पूजा प्रभूगावकर | Updated: February 16, 2024 13:45 IST2024-02-16T13:45:10+5:302024-02-16T13:45:23+5:30
या पदांसाठी सोमवार १९ रोजी थेट मुलाखती सकाळी १० ते दुपारी १२ वाजे दरम्यान पणजी मनपा कार्यालयात होतील. प

प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरसह मनपात सहा पदांची कंत्राटी भरती
पणजी: पणजी महानगरपालिका (मनपा) प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरच्या दोन पदांसह एकूण सहा पदांची कंत्राटी पध्दतीवर भरती करणार आहे. सदर पदे ही सहा महिन्यांच्या प्रशिक्षणार्थी तसेच दैनंदिन वेतन तत्वावर असतील.
या पदांसाठी सोमवार १९ रोजी थेट मुलाखती सकाळी १० ते दुपारी १२ वाजे दरम्यान पणजी मनपा कार्यालयात होतील. पणजी मनपाने प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरची दोन पदे ,प्रशिक्षणार्थी मेकेनिकल ऑटोमोबाईल इंजिनियरचे एक पद, डेटा एन्ट्री ऑपरेटरचे एक पद व गवंडीच्या दोन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरच्या पदासाठी ३० हजार ,प्रशिक्षणार्थी मेकेनिकल ऑटोमोबाईल इंजिनियरपदासाठी ३० हजार,डेटा एन्ट्री ऑपरेटरपदासाठी १८ हजार रुपये प्रती महिना तर गवंडी पदासाठी प्रती दिन ७०० रुपये इतके वेतन निश्चित केले आहे.