मुंबई-गोवा बोटसेवा फेब्रुवारी महिनाअखेर सुरू होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 01:46 PM2018-02-06T13:46:43+5:302018-02-06T13:52:08+5:30

मुंबई-गोवा बोटसेवा ज्याची लोक आतुरतेने वाट पहात आहेत ती चालू महिनाअखेर सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत

Mumbai-Goa ferry to start from end of february | मुंबई-गोवा बोटसेवा फेब्रुवारी महिनाअखेर सुरू होण्याचे संकेत

मुंबई-गोवा बोटसेवा फेब्रुवारी महिनाअखेर सुरू होण्याचे संकेत

Next

पणजी : मुंबई-गोवा बोटसेवा ज्याची लोक आतुरतेने वाट पहात आहेत ती फेब्रुवारी महिनाअखेर सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत. या प्रवासासाटी बोटीची तिकीट दरडोई ५ हजार रुपये असेल, अशीही माहिती मिळते. 
ही बोटसेवा डिसेंबरमध्ये सुरु होणार होती परंतू काही कारणांमुळे रखडली. एकाचवेळी ४00 प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेल्या ही बोट मान्सूनचे चार महिने वगळता वर्षातील आठ महिने चालू असेल. प्रवास रात्रीचा असेल आणि मुंबई ते गोवा अंतरासाठी १६ तास लागतील. मुंबईत माजगांव क्रुझ टर्मिनलवरुन ही बोट निघेल आणि दिघी, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, मालवण धक्क्यांवर थांबे घेत पणजीला येईल. ५ हजार रुपये तिकिटामध्ये जेवण किंवा अन्य सुविधा असणार नाहीत. सध्या या बोटीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी चालू आहे. आवश्यक ते परवाने लवकरच प्राप्त केले जातील. 
एकेकाळी मुंबई-गोवा समुद्रमार्गे बोट प्रवासाला मोठी गर्दी उसळत होती. आजही अनेकजण या बोट प्रवासाच्या स्मृती जपून आहेत. 
दरम्यान, गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करणाºया मुंबईतील दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीने येथे विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक  भाग म्हणून जुने गोवे ते पणजी आणि बायणा, विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी अशी ४0 आसनी आलिशान बोटसेवा सुरु केली परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दृष्टीच्या या आलिशान बोटीत बसून गोव्याच्या समुद्रकिनाºयांचे मनोहारी दृश्य पर्यटक टिपू शकतील. पणजी, बागा, जुने गोवा, सिकेरीचा आग्वाद किल्ला, दाबोळी किनाऱ्यावरील आरामदायी आणि नयनरम्य यात्रा या बोटी घडवून आणतात. आलिशान बोटींमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, प्रशस्त अंतर्गत सजावट, स्वच्छ बाथरूम, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षा बेल्टची सोय आहे. वातानुकुलित प्रवासी लाउंज आणि वेटिंग एरिया, ऑन-बोर्ड बॅगेज सहाय्य सोबत मोफत वाय-फाय, पाकीटबंद अन्नपदार्थ व पेये उपलब्ध असतात. मध्यंतरी ओखी वादळात बायणा येथील तरंगती जेटी काढावी लागली. पर्यटकांचा गोव्यातील या अंतर्गत बोटसेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 
 

Web Title: Mumbai-Goa ferry to start from end of february

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.