शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू, नितीन गडकरी यांची गोव्यात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 4:49 PM

मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर रो-रो सेवेअंतर्गत जोडला जाणार असल्याची केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात जाहीर केले.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव : गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारी गोवा-मुंबई क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासोबतच मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर रो-रो सेवेअंतर्गत जोडला जाणार असल्याची केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात जाहीर केले.दक्षिण गोव्यातील बाणावली येथे जहाजोद्योग मंत्रलयाची सहामाही आढावा बैठक चालू असून या बैठकीच्या दरम्यान गडकरी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, गोव्याच्या पर्यटन वृद्धींसाठी विमानतळावर उतरलेल्या पर्यटकाला रस्त्यावरून हॉटेलात न आणता किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स जलमार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक हॉटेलने आपली स्वत:ची तरंगती जेटी तयार करावी. जेणेकरून पर्यटकाची रस्त्यावरून ये-जा करण्याची दगदग कमी होणार आणि समुद्र सफरीचा आनंदही तो घेऊ शकेल.गोव्यातील प्रस्तावित मोपा विमानतळ दाबोळी विमानतळाला जलमार्गाने जोडता येणे शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाईल असे त्यांनी सांगितले.मुंबईतील रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का, मांडवा, नेरळ व नवी मुंबई जलमार्गाने जोडून वाहनांची वाहतूक बोटीतून रो-रो सेवेद्वारा केली जाणार असून त्यामुळे कित्येक तासांचा प्रवास काही मिनिटात होऊ शकेल असे ते म्हणाले. मुंबईच्या जेएनपीटी बंदराचा खास आर्थिक विभाग (सेझ) म्हणून विकास करण्याचा इरादा स्पष्ट करताना यामुळे सव्वा लाख नव्या नोक-या तयार होतील असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील वढण येथे नवे बंदर विकसित करण्याबरोबरच विजयदुर्ग बंदराचाही विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जेएनपीटी बंदरावर मल्टीस्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारले जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीgoaगोवा