चिखलफेक, सुडाच्या राजकारणाला थारा नाही!
By Admin | Updated: October 9, 2014 01:21 IST2014-10-09T01:21:55+5:302014-10-09T01:21:55+5:30
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव गेली सात वर्षे गोव्याच्या राजकारणापासून दूर असलेले व प्रदीर्घ काळानंतर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा गोव्यात आलेले माजी

चिखलफेक, सुडाच्या राजकारणाला थारा नाही!
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
गेली सात वर्षे गोव्याच्या राजकारणापासून दूर असलेले व प्रदीर्घ काळानंतर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा गोव्यात आलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी प्रारंभीच सावध भूमिका घेतली आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी त्यांची भेट घेतली असता, कुठल्याही वादग्रस्त विषयावर वक्तव्य करण्यास ते तयार नसल्याचे दिसून आले. ‘या सात वर्षांत लुईझिन फालेरो बदलले आहेत,’ असे त्यांनी स्वत:च्या तोंडून सांगितले. यापूर्वीचा लुईझिन फालेरो वेगळा होता; पण दिल्लीत जाऊन फालेरो बदलला आहे. माझ्या राजकारणात चिखलफेकीला किंवा सुडाच्या राजकारणाला वाव असणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. मुलाखत अशी रंगली...
प्रश्न : तुमची गोव्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. तुमचा अजेंडा काय असेल?
उत्तर : येत्या आठवड्यात पदाचा ताबा घेण्यापूर्वी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी संवाद साधणार आहे. गेली सात वर्षे माझ्यासाठी एक तपस्या होती. या सात वर्षांत मी गोव्याच्या स्थानिक राजकारणात कुठलीही लुडबूड केली नाही. मात्र, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेला आदेश मला टाळता आला नाही. त्यामुळेच मी माझ्या इच्छेविरुद्ध हे पद स्वीकारले आहे. गोव्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी माझ्याकडे कार्यक्रम तयार आहे. (पान २ वर)