शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पावसाळा लांबला की एक महिना पुढे सरकला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 16:20 IST

ऋतुचक्रानुसार पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात परतीचा पाऊस गुजरातमध्येच अडकला आहे.  देशातील बहुतेक भागात नैऋत्य मान्सून सक्रीय आहे.

पणजी : ऋतुचक्रानुसार पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात परतीचा पाऊस गुजरातमध्येच अडकला आहे.  देशातील बहुतेक भागात नैऋत्य मान्सून सक्रीय आहे. तसेच 1 जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणारा पाऊसही आता लांबतोय याचा निष्कर्श हवामान शास्त्रज्ञ एकच काढतात, आणि तो म्हणजे  मान्सून पुढे सरकतो आहे. 

अंदमान निकोबार द्वीपसमुहावर पाऊस महासागरातून पुढे गेलेला पाऊस नैऋत्य दिशेला वळसा घेऊन साधारणत: १ जून रोजी केरळ किनारपट्टीला धडक देतो आणि नंतर गोव्यात ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचतो हे सामान्य चित्र होते. परंतु मागील काही वर्षांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. मान्सुनचे आगमनही उशिरा होत आहे आणि मान्सूनचा परतिचा प्रवासही उशिरा होत आहे. म्हणजेच पावसाळा काही प्रमाणआत पुढे सरकरला आहे. 

२०११ मध्ये मान्सूनचे केरळमध्ये आगमन २९ मे रोजी झाले होते तर २०१२ मध्ये ४ जूनला, २०१३ मध्ये २ जूनला , २०१४ रोजी ६ जूनला, २०१५ मध्ये  ७ जूनला  तर २०१६ मध्ये ८ जूनल असे चढत्या क्रमाणे लांबणीवर आगमन झाल्याचे हवामान खात्याची माहिती स्पष्ट करीत आहे. २०१७ मध्ये १ जूनला केरळात जोरदार पाऊस पडला. एल निनो चक्रिवादळाच्या प्रभावाचा तो परिणाव होता. कारण मान्सून गोव्यात सामान्य वेळेपेक्षा उशिराच पोहोचला.  म्हणजेच मान्सूनचे आगमन मागील किमान ६ वर्षात  उशिराच होत आहे. 

'अलिकडील काही वर्षांत मान्सूनच्या आगमनाच्या आणि पूर्णपणे माघार घेण्याच्या तारखात बदल दिसून येत आहे. २०११ मध्ये  २९ मे रोजी केरळात पोहोचलेला मान्सून २०१६ मध्ये ८ जूनला धडकतो. तसेच मान्सूनचा परतीचा प्रवासही मागील काही वर्षांत लांबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकल्याचे आपण म्हणू शकतो असे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम एल साहू यांनी सांगितले'

वर्ष         आगमन    संपला२०१६        ८ जून        २८ ऑक्टोबर२०१५        ७ जून        १९ ऑक्टोबर२०१४         ६ जून        १८ ऑक्टोबर२०१३        २ जून        २१ ऑक्टोबर२०१२        ४ जून        १६ ऑक्टोबर२०११         २९ मे        २४ ऑक्टोबर 

टॅग्स :Rainपाऊस