कामतांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली
By Admin | Updated: October 18, 2015 02:41 IST2015-10-18T02:40:48+5:302015-10-18T02:41:15+5:30
पणजी : दिगंबर कामत यांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयानेही हिरवा कंदील दाखवला नसल्याने आता गोवा पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याविषयी गांभीर्याने विचार करत आहेत

कामतांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली
पणजी : दिगंबर कामत यांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयानेही हिरवा कंदील दाखवला नसल्याने आता गोवा पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याविषयी गांभीर्याने विचार करत आहेत. अशी दाद मागणे कितपत व्यवहार्य ठरू शकेल यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चर्चिल आलेमाव यांना लुईस बर्जरप्रकरणी प्रदीर्घ काळ कोठडीची हवा खावी लागली. मात्र, या प्रकरणाचे सूत्रधार असे पोलिसांनी ज्यांना संबोधले त्या कामत यांना जामीन मिळतो, ही पोलीस आणि सरकारला परवडणारी बाब नसल्याने भाजपातही अस्वस्थता आहे. कामत यांच्या अटकेबाबत सरकार उदासीन नाही, असे संकेत विशेषत: अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत जाऊ नयेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या शक्यतेवर विचारविमर्ष सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची प्रक्रिया क्राईम ब्रँचने सुरू केली आहे. त्यासाठी कायदा तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात हे आव्हान कितपत तग धरू शकेल, यावर तज्ज्ञांशी चर्चा करूनच मत अजमावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.