पाच वर्षांच्या चिमुरडीसह आईची आत्महत्या
By Admin | Updated: October 12, 2015 02:01 IST2015-10-12T02:01:12+5:302015-10-12T02:01:35+5:30
म्हापसा : सातेरीनगर, वेर्ला-काणका येथे आईने पाच वर्षांच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि.११) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली

पाच वर्षांच्या चिमुरडीसह आईची आत्महत्या
म्हापसा : सातेरीनगर, वेर्ला-काणका येथे आईने पाच वर्षांच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि.११) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ पसरली आहे. स्पर्श महेंद्र नाईक (वय ३१) आणि पूर्वजा (वय ५) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पोलिसांनी ही माहिती दिली.
स्पर्श यांचे पती महेंद्र कराटे शिकवतात. कराटे शिकणाऱ्या मुलांना घेऊन रविवारी सकाळी ते सहलीला गेले होते. या वेळी स्पर्श यांनी पंख्याला साडीने गळफास लावून घेतला. महेंद्र नाईक कुटुंबीय माडीवर राहातात. त्यांची आई, भाऊ व अन्य नातेवाईक तळमजल्यावर राहातात. या नातेवाईकांना बऱ्याच वेळापासून पूर्वजाचा आवाज न आल्याने महेंद्रचा भाऊ प्रसाद याने माडीवर जाऊन पाहिले. या मायलेकी न दिसल्याने त्याने बेडरूमचे दार ठोठावले; परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही. प्रसाद याने (पान २ वर)