मोरजी, मांद्रे किनार्यावरील
By Admin | Updated: June 6, 2014 01:56 IST2014-06-06T01:55:18+5:302014-06-06T01:56:07+5:30
पेडणे : मोरजी व आश्वे-मांद्रे किनारी भागात सीआरझेड कायद्याचा भंग करून पक्क्या काँक्रिटने बांधलेली तीन बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली.

मोरजी, मांद्रे किनार्यावरील
पेडणे : मोरजी व आश्वे-मांद्रे किनारी भागात सीआरझेड कायद्याचा भंग करून पक्क्या काँक्रिटने बांधलेली तीन बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली.
गावडेवाडा-मोरजी सर्व्हे क्र. १८२/४ या जागेत गुणाजी ऊर्फ नीलेश मोरजकर यांनी राहाण्यासाठी दोन खोल्या बांधल्या होत्या. ही जागा हल्लीच एका मंत्र्याने मुलाच्या नावावर विकत घेतली असून, त्यानेच या बांधकामाविषयी सीआरझेड, पंचायत, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीला अनुसरून जलद गतीने शासकीय यंत्रणेने विलंब न लावता बांधकाम पाडले. मोरजकर यांचे बांधकाम मोडले गेल्याने त्यांना १ लाखाचे नुकसान सोसावे लागले व घरसंसार रस्त्यावर आला. सर्व्हे क्र. १८२/१ या जागेत फ्रेश क्लब यांचे बांधकाम पक्क्या काँक्रिटने केले होते, तेही पाडले गेले. आश्वे-मांद्रे येथील सर्व्हे क्र. २२३/१ जागेत एका रेस्टॉरंटचे बांधकाम होते, तेही पाडण्यात आले. पेडणेचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणार्थ ही कारवाई केली. (प्रतिनिधी)