शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा 

By किशोर कुबल | Updated: April 24, 2024 16:12 IST

Lok Sabha Election 2024 : तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तऱ्हेने पुढे जात आहे.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या २७ रोजी सांकवाळ येथे होणार असलेल्या जाहीर सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ' मोदींच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. मुरगांव तालुक्यातील भाजप आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास हे विशेष जबाबदारी घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पन्नास हजार पेक्षा जास्त लोक सभेला येतील, अशी आमची खात्री आहे. तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तऱ्हेने पुढे जात आहे. घरोघर प्रचार सुरू झालेला आहे.दरम्यान, भारतीय रिपब्लिकन पार्टीने (आठवले गट) भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून पक्षाचे गोवा प्रभारी बाळासाहेब बनसोडे यांनी पाठिंब्याचे पत्र तानवडे यांच्याकडे सुपूर्द केले.     प्रदेश भाजपचा जाहीरनामा २९ रोजीप्रदेश भाजप आपला जाहीरनामा येत्या २९ रोजी जाहीर करणार असल्याचे तानावडे  एका प्रश्नावर म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी  जोरदार टीका केली. सावंत सरकारने ज्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दलची आश्वासने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतात, असे तानावडे म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर हेही उपस्थित होते.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा