मोपाप्रश्नी भाजपचे मौन; ‘जैका’प्रश्नी आक्रमक
By Admin | Updated: July 21, 2015 02:17 IST2015-07-21T02:16:55+5:302015-07-21T02:17:05+5:30
पणजी : लुईस बर्जर व जैका प्रकल्प लाच प्रकरणावरून राज्यात आता सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्ष असे राजकीय युद्धच सुरू झाले आहे

मोपाप्रश्नी भाजपचे मौन; ‘जैका’प्रश्नी आक्रमक
पणजी : लुईस बर्जर व जैका प्रकल्प लाच प्रकरणावरून राज्यात आता सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्ष असे राजकीय युद्धच सुरू झाले आहे. सत्ताधारी भाजपने काँग्रेस नेत्यांची कोंडी करण्याची आयती संधी साधून लाच प्रकरण तापविणे सुरू केले आहे, तर विरोधी काँग्रेसने लुईस बर्जरने सल्लागार म्हणून काम केलेल्या गोव्यातील सर्वच प्रकरणी चौकशी करा, अशी मागणी करत पलटवार केला आहे.
‘जैका’अंतर्गत गोव्यात सध्या सुमारे १ हजार कोटींची कामे सुरू आहेत. सुमारे साडेपाचशे कोटींची कामे पूर्णही झाली आहेत. जैकाच्या कामांसाठी सल्लागार असलेल्या लुईस बर्जर कंपनीने गोव्यातील एका माजी मंत्री व अधिकाऱ्याला सहा कोटींची लाच दिल्याच्या (पान २ वर)