मोपा’वरून पहिले विमान २0१९ साली : मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 14, 2015 01:30 IST2015-10-14T01:29:53+5:302015-10-14T01:30:09+5:30
पणजी : नियोजित मोपा विमानतळासाठी विकासक येत्या फेब्रुवारीमध्ये निवडला जाईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. येत्या

मोपा’वरून पहिले विमान २0१९ साली : मुख्यमंत्री
‘पणजी : नियोजित मोपा विमानतळासाठी विकासक येत्या फेब्रुवारीमध्ये निवडला जाईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. येत्या वर्षात आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल आणि पहिला टप्पा ३६ महिन्यांत पूर्ण केला जाईल. २0१९ साली ‘मोपा’वरून पहिले विमान उडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एव्हिएशन एसीटी फोरम-२0१५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन दिवसांची ही विमान वाहतूकविषयक शिखर परिषद ‘सिटा’ने आयोजित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, मोपाचे काम चार टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर वार्षिक ४४ लाख प्रवासी हा विमानतळ हाताळणार आहेत. चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची वार्षिक १ कोटी ३0 लाखपर्यंत पर्यटक हाताळण्याची क्षमता असेल.
भारतीय विमानतळ प्राधिकरण, जीव्हीके, जीएमआर आणि एस्सेल इन्फ्रा आदी एकूण पाच कंपन्यांना महिनाअखेरपर्यंत आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन) सादर करण्यास सांगितले आहे.
मोपा विमानतळ झाला तरी ‘दाबोळी’वर कोणताही परिणाम होणार नसून दाबोळी
विमानतळ चालूच राहणार असल्याचा पुनरुच्चार पार्सेकर यांनी केला. (प्रतिनिधी)