शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘कदंब’चे पास वितरण बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:06 IST

नियमित प्रवाशांसह विद्यार्थ्यांची परवड

पणजी : गोव्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळाने नियमित प्रवास करणाऱ्यांना तसेच खास करुन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले जाणारे सवलतीच्या दरातील पास वितरित करणे बंद केले आहे. सरकारकडून सबसिडी मंजूर न झाल्याच्या कारणास्तव तूर्त पास बंद करण्यात आले असून यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. नियमित प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना पूर्ण तिकीटभाडे देऊनच प्रवास करावा लागेल. सुमारे २२ हजार पासधारकांना याचा फटका बसणार आहे.

मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पास घेणाºयांची मोठी परवड झाली आहे. डिसेंबरनंतरच पासबाबत निर्णय होईल, असे महामंडळाच्या कार्यालयातून सांगण्यात येते. गेल्या वर्षीही ‘कदंब’ने असाच घोळ घातला होता त्यानंतर ‘लोकमत’ने पाठपुरावा केला आणि वित्त खात्याने सबसिडी मंजूर केल्यानंतरच पास वितरण सुरु झाले. गत साली झालेला घोळ माहीत असतानाही महामंडळाने वेळीच ही सबसिडी मंजूर करुन घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायला हवा होता किंवा सरकारने तरी वेळीच सबसिडी मंजूर करायला हवी होती. याबाबतीत दोघेही निष्क्रिय ठरले, अशा संतप्त प्रतिक्रिया पासधारकांकडून येत आहे. 

कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परैरा नेटो यांना याबाबत विचारले असता योजनेची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे त्यामुळे योजनेचे नूतनीकरण आवश्यक आहे. सरकारला फाइल पाठवली असून सबसिडी मंजुरीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. अधिसूचना काढल्यानंतरच पास वितरण सुरु केले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

 येथील बस स्थानकावर असलेल्या काउंटरवर पाससाठी लोक रोज रांगा लावतात. यात टर्म पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांचाही समावेश असतो परंतु लांबलचक रांगेत तासन्तास घालवल्यानंतर माणूस काउंटरवर पोचतो तेव्हा त्याला पास वितरण बंद केल्याचे सांगण्यात येते. या काउंटरवर साधी नोटिस लावण्याचे सौजन्यही महामंडळाने दाखवलेले नाही. आणि त्याबाबत कोणी विचारले तर दुरुत्तरे दिली जातात.  काऊंटरवरून गेल्या काही दिवसांत अनेक विद्यार्थ्यांना तसेच नियमित प्रवास करणाऱ्यांना पास न देता परत पाठवण्यात आले. विद्यार्थी, पालकांमध्ये त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :goaगोवाstate transportराज्य परीवहन महामंडळ