मनी लाँडरिंग प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुध्द सीबीआयचा खटला मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:10 IST2018-01-05T19:10:35+5:302018-01-05T19:10:43+5:30
माजी गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुध्दचा सीबीआयने दाखल केलेला मनी लाँडरिंग प्रकरण आज मागे घेण्यात आले.

मनी लाँडरिंग प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुध्द सीबीआयचा खटला मागे
मडगाव : माजी गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुध्दचा सीबीआयने दाखल केलेला मनी लाँडरिंग प्रकरण आज मागे घेण्यात आले. सीबीआयने हे प्रकरण मागे घेण्यासंबधी मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने आज हा अर्ज मंजूर केला. याशिवाय पाशेको यांच्यावतीने सीबीआयने जप्त केलेली कागदपत्रके व अन्य सामुग्री परत करण्यासंबधी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अर्जही शुक्रवारी न्यायलायाने मंजूर केला.
दरम्यान आपल्याविरुध्द दाखल केलेले हे खटले राजकीय हेतुने प्रेरीत होते असा आरोप मिकी पाशेको यांनी पत्रकार परिषदेत केला. आपल्याविरुध्द कुठलाही पुरावा सीबीआयला मिळाला नाही. आपण निदरेष असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असे पाशेको म्हणाले. 8 सप्टेंबर 2010 साली पाशेको यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात सीबीआयने छापा टाकला होता. तब्बल 72 तास हा छापा चालू होता. मनी लाँडरिंग प्रकरणात कुठलाही पुरावा नसल्याने हा खटला मागे घेण्यासंबधी सीबीआयने काही महिन्यापुर्वी येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर यापुर्वी अनेकदा सुनावणी होउन युक्तीवादही संपला होता. तर दुस:या बाजूनी सात वर्षापुर्वी जप्त केलेली कागदपत्रके परत करण्यासाठी पाशेको यांनी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. 2010 पासून सीबीआयने पाशेको यांची बँक खाती गोठावली होती. तर 2014 पासून मिकीच्या ताफ्यात असलेल्या ब:याच अलिशान गाडया आयकर खात्याने जप्त केल्या होत्या.