मोहीद्दीन कुन्नीचा जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: May 7, 2014 00:56 IST2014-05-06T18:02:55+5:302014-05-07T00:56:36+5:30

मडगाव : पुत्तूर-कर्नाटक येथील मोहीद्दीन कुन्नी (५२) याने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी मंगळवारी फेटाळला. कुडतरी पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. आरोपीविरुध्द कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्याचा विविध गुन्‘ांत सहभाग असल्याने फरार होण्याची शक्यता सरकारी वकील सुभाष देसाई यांनी व्यक्त केली होती.

Mohiuddin Kunani's bail application was rejected | मोहीद्दीन कुन्नीचा जामीन अर्ज फेटाळला

मोहीद्दीन कुन्नीचा जामीन अर्ज फेटाळला

मडगाव : पुत्तूर-कर्नाटक येथील मोहीद्दीन कुन्नी (५२) याने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी मंगळवारी फेटाळला. कुडतरी पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. आरोपीविरुध्द कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्याचा विविध गुन्‘ांत सहभाग असल्याने फरार होण्याची शक्यता सरकारी वकील सुभाष देसाई यांनी व्यक्त केली होती.
कावोरी कोमुनिदादचे ॲटर्नी ॲण्ड्र्यू दा सिल्वा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून १७ सप्टंेबर २0११ रोजी सां जुझे दी आरियल पंचायत क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ७५/१ येथे बेकायदेशीररीत्या आमोनियम नायट्रेट, इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, वायर आदी सामग्री वापरून स्फोट घडवून आणला, असा आरोप मायणा-कुडतरी पोलिसांनी ठेवला आहे.
मोहीद्दीन कुन्नी यांच्या व्यतिरिक्त सां जुझे दी आरियल येथील जुझे आंतोनियो गोम्स, शशी गोम्स उर्फ गोसावी, हावेरी-कर्नाटक येथील मेहबूबसाब बडकप्पानवर, राजस्थान येथील सत्यनारायण दरोगा, राजूलाल चमार, इस्माईल तहसीलदार, जमनालाल चौधरी, गुडी येथील ज्योकीम कार्वालो हे या प्रकरणातील संशयित आहेत. पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला.
आंबावली येथे एका घरात स्फोटके उतरविण्यात आली असता मोहीद्दीन कुन्नी हा योगायोगाने पोलिसांना हाती लागला होता. कुन्नीचा इतर गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध असल्याने तो राज्यातील पोलिसांना हवा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. इतर पोलीसही लवकरच कुन्नी यांच्याविरुध्द न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mohiuddin Kunani's bail application was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.