शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

"डबल इंजिन सरकार गोव्याचा यापुढेही चौफेर विकास करेल ही मोदीची गॅरंटी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 18:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगावच्या सभेत दिली ग्वाही, विकसित भारत विकसित गोवा २०४७: पंतप्रधानाच्या हस्ते १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे झाले उदघाटन

सूरज नाईकपवार

मडगाव: गोव्याने प्रत्येक क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावेली असून, विकासही साधला आहे. डबल इंजिन सरकार गोव्याचा आणखिन विकास करणार ही मोदीची गँरेटी आहे असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगावात जाहीर सभेत बोलताना दिली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सरकारने आतापर्यंत राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. येथील कंदब बसस्थानकावर आयोजित या सभेत प्रचंड जनसमुदाय जमला होता.

मोदी यांच्या हस्ते गोव्यात १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमंतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी झाली. यात कुंकळळी येथील एनआयटी गोवा कॅम्पस, दोनपावला येथे एन आय डब्लु एस गोवा कॅम्पस व कुडचडे येथील घनकचरा व्यवस्थापन सुविधांचा उदघाटन तर पणजी आणि रेईश मागुश किल्ला दरम्यान रोपवे प्रकल्प व शेळपे येथील १०० एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्पच्या पायाभरणीचा समावेश आहे. 

व्यासपीठावर यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई , सभापती रमेश तवडकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, केंद्रीय मंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक , मंत्री माविन गुदीन्हो, सुभाष शिरोडकर, रवी नाईक,भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत व अन्य मान्यवरांचा समावेश होता.गोवा हे पर्यटकांचे हॉलिडे डेस्टिनेशन आहे. हे राज्य आकाराने लहान असले तरी येथील विविधतेने गोवा खुप मोठा ठरत आहे. येथील लोक, धार्मिक सलोखा, निर्सगाचाही पंतप्रधानानी आपल्या भाषणात उल्लेख केला.

या भुमीने देशाला अनेक महनीय व्यक्ती दिल्या. संत सोहिरोबानाथ आंबिये , सूरश्री केसरबाई केरकर, आदय नाटकार कृष्णभट बानकर आचार्य धर्मानंद कोसंबे , शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, भारतरत्न लत्ता मगेंशकर, ज्यांची आज पुण्यतिथी आहे आपण त्यांना श्रध्दांजली वाहत असल्याचे मोदी म्हणाले. येथील दामोदर साल मध्ये स्वामी विवेकानंद आले होते.नवीन प्रेरणा त्यांना लाभली, ऐतिहासिक लोहिया मैदानावर मुक्ती लढाची पेट पेटविली गेली. कुंकळ्ळी येथील चीफटन मेमेरियल हे गोव्याचे शौर्याचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शवप्रदर्शन हाेणार आहे. शिक्षण , स्वास्थ व पर्यटनला गती देणारी विकासकामे राबविली जाणार आहे. सबका साथ सबका विकास हा भाजपचा मंत्र आहे.

लोकांना खोटी आश्वासने देणाऱ्यांना गोव्यातील लोकांनी यापुर्वी उत्तर देताना त्यांना झिडकारले , सुशासन हा विकासाचा मॉडेल आहे. घरात नळ जोडणी, हगणदारीतून मुक्त, घराघरात वीज, एलपीजी कनेशक्न आदीत या राज्याने १०० टक्के यश मिळविले आहे ४ कोटी लोकांना पक्की घराचा लाभ मिळाला आहे आता आणखीन २ कोटी घरे बांधली जाईल. गोव्यात कुणाकडे पक्के घर नाही त्यांनी सांगावे, पक्का घर बनवून दिले जाईल ही मोदीची गँरेटी आहे असे त्यांनी सांगितले.

आयुष्यमान योजना, धन मत्ससंपदा योजनांचीही माहिती त्यांनी दिली. या योजनेतून रोजगार उपलब्ध होईल. रस्ता, रेल्वे व विमानसेला ११ लाख कोटी खर्च केल १० वर्षापुर्वी हा आकडा २ कोटी इतकाच होता मोपा आंतराष्ट्रीय विमानतळ, झुआरी पुलावरील कॅमल पुल चाही त्यांनी उल्लेख केला. भारतात प्रत्येक प्रकाराचे पर्यटन उपलब्ध आहे.पुर्वी त्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नव्हते. द्ष्टी नव्हती. गोव्यात आता इको पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल , त्याचा सरळ लाभ येथील लोकांना होणार आहे. रोपवे, फुड कॉर्ट, वेटिंग रुम, रेस्टॉरन्ट ही आकर्षणाची केंद्रे असेल, कॉन्फरन्स पर्यटनाचीही पंतप्रधानांनी उल्लेख केला. गोव्यातील लोकांचे फुटबॉल प्रेम जगजाहीर आहे. ब्रम्हानंद शंखवाळकर यांना पद्मपुरस्कार ने सन्मानीत केले. खेलो इंडिया चाही लाभ झाला. गोवा शैक्षणिक हब बनेल असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात मोदी आहे तर सर्व काही शक्य असल्याचे सांगितले. पायाभूतसाधन सुविधांचा विकासाचे श्रेय पंतप्रधानानांच जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अंत्योदया तत्वावर चालणारे हे सरकार आहे.लहान घटकांना बरोबर घेउन वाटचाल केली जात आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा