मित्राचा घात भोवला!

By Admin | Updated: June 25, 2014 17:23 IST2014-06-25T17:23:29+5:302014-06-25T17:23:41+5:30

पणजी : गाजलेल्या मंदार सुर्लकर अपहरण व खून प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी या चौघांनाही तिहेरी

Mitra is dead! | मित्राचा घात भोवला!

मित्राचा घात भोवला!

पणजी : गाजलेल्या मंदार सुर्लकर अपहरण व खून प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी या चौघांनाही तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मंदार याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. बाल न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी या चौघांनाही अपहरण, खून, गुन्हेगारी संगनमत, तसेच पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली सोमवारी दोषी ठरविले होते.
अपहरणासाठी भादंसंच्या कलम ३६४ (अ) खाली जन्मठेप, खुनासाठी कलम ३0२ खाली जन्मठेप व १0 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, गुन्हेगारी संगनमतासाठी कलम १२0 (ब) खाली जन्मठेप, १0 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी कलम २0१ या कलमांखाली तसेच बाल हक्क कायद्याच्या कलम ८ खाली पाच वर्षे सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. सर्व आरोपींनी आतापर्यंत आग्वाद कारागृहात आठ वर्षे कैद भोगलेली आहे. जन्मठेपेची शिक्षा १४ वर्षे असते. (प्रतिनिधी)

Web Title: Mitra is dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.