अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

By Admin | Updated: May 7, 2016 02:54 IST2016-05-07T02:45:23+5:302016-05-07T02:54:11+5:30

वास्को : वेर्णा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी १९ वर्षीय

Minor girl raped by kidnapping | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

वास्को : वेर्णा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कर्नाटकातील रहिवाशी व सध्या माजोर्डा येथे राहात असलेल्या विनायक कामत याने २१ एप्रिल रोजी वेर्णा येथील एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार वेर्णा पोलीस स्थानकात २८ एप्रिल रोजी नोंदविली होती. वेर्णा पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत शोधकार्य हाती घेतले असता, गुरुवारी वेर्णा पोलिसांना अपहरणकर्ता आणि ती मुलगी माजोर्डा येथे सापडली. वेर्णा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी केली असता, पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले.
वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी विनायक कामत याच्यावर भादंसंच्या ३६३, गोवा बाल कायदा कलम ४ आणि पोस्को कायद्याच्या कलम ४ खाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे साहाय्यक निरीक्षक नवीन देसाई हे निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl raped by kidnapping