शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:43 IST

महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचा आरोप 

पणजी : मुरगांव बंदरातील कोळसा हाताळणी बंद करण्यास स्थानिक आमदार तथा नगरविकासमंत्री मिलिंद नाईक हे त्यांचे हितसंबंध गुंतल्यानेच उत्सुक नसल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे. कोळसा वाहतूक, मजूर पुरविण्याची कंत्राटे मंत्री नाईक यांच्याकडे आहेत. म्हणूनच ते या प्रश्नावर काही करू इच्छित नाहीत, असा आरोप करण्यात आला. 

पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी मंत्री मिलिंद नाईक यांची मयुरेश्वर ट्रान्स्पोर्ट कंपनी असून त्याव्दारे बर्थ क्रमांक 7 अ वरुन अदानी कंपनीच्या आणि बर्थ क्रमांक 5 अ आणि 6 अ वरुन जिंदाल कंपनीच्या कोळशाची वाहतूक ते करतात. डेल्टा कंपनीत ते संचालक आहेत. झुवारी अ‍ॅग्रो कारखान्याला धमकी देऊन कंत्राट मिळविले तसेच मजूर पुरविण्याची कंत्राटेही ते घेतात, अशा आरोप कुतिन्हो यांनी केला. अदानी आणि जिंदाल या दोन्ही कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त कोळसा हाताळणी चालवली आहे त्यामुळे वास्को शहरातच नव्हे तर सडा, रुमडावाडा, जेटी, बायणा, खारीवाडा आदी आजुबाजुच्या परिसरातही कोळशाचे प्रचंड प्रदूषण होत आहे. स्थानिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळ पोचली आहे. 

कुतिन्हो पुढे म्हणाल्या की, ‘काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते तेव्हा मुरगांव बंदरात बर्थ क्रमांक 10 आणि 11 वरुन कोळशा हाताळणी चालू होती. परंतु मुरगांव बचाव अभियानने आवाज उठविल्यानंतर सरकारने त्वरित कोळसा हाताळणी बंद केली.’ कोळसा हाताळणी बंद केल्यास 500 कामगार उपाशी पडतील या मंत्री नाईक यांच्या दाव्यात काहीच अर्थ नाही. या ठिकाणी असलेले कामगार झारखंड, ओडिशा आदी भागातील परप्रांतीय आहेत, असे ते म्हणाले. वेस्टर्न इंडिया शिपयार्ड बंद पडले तेव्हा 350 कामगारांचा उदरनिर्वाह गेला त्यावेळी नाईक यांना काही वाटले नाही का?, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.              ‘एक जागा महिलांना मिळावी’लोकसभेसाठी महिला काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करणार काय या प्रश्नावर कुतिन्हो म्हणाल्या की, ‘दोनपैकी किमान एक जागा तरी महिला उमेदवाराला मिळायला हवी. महिलांना प्रतिनिधीत्त्व दिले तर निश्चितच त्याचे स्वागत करु.’ दरम्यान, ‘महिला काँग्रेस एनजीओ बनल्यासारखी वागत आहे, अशी जी टिका आवदा व्हिएगश यांनी केली होती त्याचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, ‘ मदत मागण्यासाठी पीडीत युवतीचे पालक माझ्याकडे आले होते. मी त्यांच्याकडे गेले नव्हते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसministerमंत्री